Serial killer itali leonarda cianciulli Story :सीरीयल किलर हे सामान्य गुन्हेगाराप्रमाणे नसतात. गुन्हा करण्याचा त्यांचा पॅटर्न खुपच वेगळा असतो. या गुन्ह्याची कल्पना देखील एखादा व्यक्ती करू शकत नाही, इतकी थरारक आणि हादरवून सोडणाऱ्या घटना ते घडवून आणत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत सीरीयल किलर महिला 17 वेळा प्रेग्नेंट राहिली होती. तिने रक्तापासून केक बनवला तर मृतदेहापासून साबण बनवले होते. हीच साबण आणि केक ती नागरिकांना विकायची. या सीरीयल किलरची कहानीच खुपच थरारक आहे. (Serial killer itali leonarda cianciulli soap blood cake shocking story)
ADVERTISEMENT
आईच्या अत्याचाराचा परिणाम
इटलीच्या मोंटेला शहरात 18 एप्रिल 1894 रोजी लियोनार्डा सियानियुली या चिमुकलीचा जन्म झाला होता. लियोनार्डाची आई तिला अजिबात पसंद करायची नाही. कारण कमी वयातच तिच्या आईवर बलात्कार झाला होता. या बलात्कारी व्यक्तीसोबत तिच्या कुटूंबियांनी तिचे लग्न लावून दिले होते. त्यामुळे या अत्याचारातून लियोनार्डाचा जन्म झाला होता. या जन्मानंतर लियोनार्डाला आईचे प्रेम कधीच मिळालं नाही याउलट द्वेशच मिळाला. तसेच लियोनार्डाला आई खुप मार-झोड करायची. या गोष्टीचा तिच्यावर खुप वाईट परिणाम झाला. लियोनार्डा नेहमी शांत शांत राहायची, तिला कोणाशीही बोलावेसे वाटायचे नाही. ती मित्र देखील बनवायची नाही. दोनदा तिने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता, मात्र ती यातून बचावली होती. पुढे ती 22 वर्षांची झाल्यावर तिचे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार आईने मुलेही पाहिली होती.मात्र लिओनार्डाने तिच्या आवडीच्या राफेल पॅनर्सर्डी सोबत लग्न केले होते. या लग्नाची माहिती आईला लागताच तिने तिला शाप दिला होता. या लग्नात तु कधीच सुखी राहणार नाहीस, असा शाप आईने दिला होता.
हे ही वाचा : Crime: पत्रकार म्हणून मिरवलं, पण डान्स बारने सारं काही हिरवलं; पैशासाठी…
केकचं दुकान उघडलं
आईने शाप दिल्यानंतर लियोनार्डा दुसऱ्या शहरात जाऊन स्थायिक झाली होती. तसेच तिने एक दुकान देखील उघडले होते, या दुकानात ती केक आणि साफसफाईचे सामान विकायची. पुढे जाऊन तिच्या केकची चटक संपूर्ण शहराला लागली होती. त्यामुळे ती खुप प्रसिद्ध झाली होती आणि दुर-दूरहून नागरीक तिच्या दुकानात यायची.
17 वेळा राहिली प्रेग्नेंट
एकिकडे लियोनार्डाचा व्यवसाय खुप तेजीत होता, तर दुसरीकडे तिच्या पर्सनल आयुष्यात खुप उलथा-पालथ सुरू होती. लियोनार्डा 17 वेळा प्रेग्नेंट राहिली होती. यामध्ये तीन वेळा तिचा गर्भपात झाला होता.तर 10 वेळा तिचे बाळ जन्मताच मृत्यू पावले होते. त्यामुळे आता लियोनार्डाची फक्त चारच मुले होती, ज्यांना घेऊन ती नेहमी चिंतेत असायची. कारण तिला नेहमी आईचा शाप आठवायचा. या शापमुळे तिच्या आयुष्यात हे सगळं सुरु होतं, असे तिला वाटायचे.
तांत्रिकाने सांगितला उपाय
एका तांत्रिकानेने देखील तिची मुलं जास्त काळ जगणार नाहीत, कमी वयातच मरतील,असे सांगितले होते. त्यामुळे तिने अनेक तांत्रिकाला भेटून यावरचा उपाय विचारला होता. यामधील एका तांत्रिकाने तिला नरबळीचा उपाय सांगितला होता. जर तिने नरबळी दिला तर तिची मुले सुरक्षित राहतील. अंधविश्वासामुळे लियोनार्डाने नरबळी घेण्याचा विचार सूरू केला आणि शोधाशोध सुरु केली.
हे ही वाचा : बॉयफ्रेंडला घरी बोलावून सासू-सासऱ्यांची हत्या,पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा
पहिला शिकार
लियोनार्डाच्या दुकानात असंख्य लोक यायची, त्यामुळे तिने तिथूनच तिचा पहिला शिकार शोधला होता. फॅस्टिना सेट्टी नावाची तिची पहिली शिकार होती. फॅस्टिनाला तिच्यासाठी मुलगा शोधल्याचे बहाणे घरी नेऊन तिची हत्या केली. फॅस्टिनाच्या शरीराचे तिने 9 तुकडे गेले आणि त्यांना साबण बनवणाऱ्या कास्टीक सोड्यात मिक्स केले. मृतदेहाचे तुकडे कॉस्टिक सोड्यामध्ये वितळल्यानंतर त्याने तो सोडा गटारात टाकला. इतक्यावरच ती थांबली नाही तर तिने फॅस्टिनाच्या रक्तापासून केक बनवले आणि हे केक तिचा पती, मुलगा, मित्र आणि शेजाऱ्यांना खाऊ घातले.
दुसरा शिकार
22 सप्टेंबर 1940 रोजी तिने दुसरा नरबळी घेतला. नोकरी देण्याच्या आमिशाने फ्रांसेस्का सोवीला तिने घरी बोलावून हत्या केली. त्यानंतर तिने पहिल्या मृतदेहाच्या तुकड्यासोबत आणि रक्तासोबत जे केले, तेच फ्रांसेस्का सोबतही केले. त्यानंतर तिने तिसरा बळी वर्जीनिया कॅसियोपो हीची हत्या केली. प्रत्येक हत्येत तिने सेम पॅटर्न वापरला होता. तसचे मृतदेहासोबत एकसाऱखीच निर्दयी घटना केली.
हे ही वाचा : आरोपीच्या घरी गेलेल्या पोलिसांसमोरच महिलांनी उतरवले कपडे
पोलिसांनी असा लावला छडा
या घटनेत तीन हत्या करून देखील पोलिसांना तिचा मागोवा लागला नव्हता. मात्र वर्जीनीयाच्या हत्या प्रकरणात तिच्या मोठ्या बहिणीने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला होता. या तपासात पोलिसांना वर्जीनिया लियोनार्डाला भेटत असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी लियोनार्डाला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली होती. या चौकशीत तिने हत्येची कबूली दिली. 1946 ला तिचा 33 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा झाली. त्यानंतर 15 ऑक्टोबर 1970 ला तिचे निधने झाले. या घटनेवर अनेक पुस्तकही लिहण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT