नवी दिल्ली: भारताच्या (India) नेतृत्वात आज जगात सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन (Yoga Day) साजरा केला जात आहे. कोरोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर या वेळीही योग कार्यक्रम बऱ्याच सावधगिरीने आयोजित केला जात आहेत. दरम्यान योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी (PM Modi) देशातील जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘योग ते सहयोग’ असा मंत्रही जनतेला दिला आहे. तसंच त्यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे.
ADVERTISEMENT
M-Yoga अॅपची घोषणा
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात असं म्हटलं की, योग ही फक्त शारीरिक शक्तीच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील आपल्याला तंदुरुस्त ठेवते. योग आपल्याला स्ट्रेसपासून स्ट्रेंथ आणि निगेटिव्हिटीतून क्रिएटिव्हिटीचा रस्ता दाखवतो.
यावेळी पंतप्रधान मोदी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, भारत आता जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून M-Yoga
अॅपची सुरुवात करणार आहे. या मोबाइल अॅपमध्ये योगाचे वेगवेगळे आसन आणि माहिती आपल्याला मिळणार आहे. जी जगातील वेगवेगळ्या भाषांमध्येही उपलब्ध असणार आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या या योग यात्रेला आपल्याला आणखी पुढे घेऊन जायचं आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणते सकारात्मक ऊर्जेसाठी योगा उत्तम
‘योग आपलं सुरक्षा कवच आहे’
आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे ती अत्यंत कठीण आहे. अशा कठीण समयी लोकं योग विसरु शकले असते. पण यादरम्यान योगाबाबत लोकांचा उत्साह वाढला आहे. योगाद्वारे लोक संयम आणि शिस्त शिकत आहे. जेव्हा कोरोनाने जगात प्रवेश केला तेव्हा कोणताही देश त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हता. पण या संकट काळात योगा हा एक आशेचा किरण बनला आहे.’
‘कोरोना काळात भलेही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन झालेले नाही पण योग दिवसाबाबतचा उत्साह काही कमी झालेला नाही.’ असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
अशी ठेवते अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस स्वतःला फीट; पहा फोटो!
योग दिनानिमित्त देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. उत्तराखंडच्या हरिद्वार येथे योगगुरु रामदेव यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेथे योग दिनाच्या निमित्ताने अनेकांनी योगाचे आसान केले आहे.
फक्त हरिद्वारच नाही तर योग दिनाच्या संदर्भात देशाच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचवेळी, जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जिथे कोरोना रुग्णसंख्या अटोक्यात आली आहे तिथे योग दिनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त छोट्या पडद्यावरील कलाकार म्हणतायत ‘जान है तो जहाँ है’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राकडे केलेल्या आवाहनानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास सुरवात झाली आहे. भारताच्या पुढाकाराने जगातील अनेक देश याबाबतीत आता सकारात्मकदृष्टीने पुढे जात आहेत. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ADVERTISEMENT