डोंबिवलीच्या लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ठाणे पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलने ही कारवाई केली असून ४ मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. तसेच लॉजिंग बोर्डिंगचा मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. डोंबिवलीसारख्या संस्कृत शहरात सेक्स रॅकेट सुरु असुनही याचा सुगावा स्थानिक पोलिसांना लागत नाही याबद्दल स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ADVERTISEMENT
डोंबिवली पूर्व येथे सागर्ली चौक परिसरात बालाजी दर्शन नावाची इमारत आहे. या इमारतीत हॉटेल साईराज लॉजिंग आणि बोर्डिंग आहे. या लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलला मिळाली होती. सोमवारी रात्री ठाणे पोलिसांच्या पथकाने इथे छापा घालून कारवाई करत ४ तरुणींची सुटका केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या भागात डोंबिवली शहरातलं प्रसिद्ध बालाजी मंदीर आहे. त्यामुळे या भागात भाविकांची चांगलीच रेलचेल असते.
पोलीस पथकाने सर्वात आधी एक बोगस गिऱ्हाईक पाठवून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. यानंतर कारवाईदरम्यान पोलिसांनी या लॉजिंग बोर्डींगचा व्यवस्थाप, कॅशिअर, दोन वेटर आणि मुलींचा पुरवठा करणाऱ्या दोन दलालांना अट केली आहे. सर्व आरोपींविरोधात 376 (2), 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Raj Kundra चा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला
अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलचे अधिकारी अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. डोंबिवलीसारख्या सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीमध्ये अशाप्रकारे सुरू असलेल्या देहव्यापाराकडे या परिसरातील पोलीस दुर्लक्ष का करतात ? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT