अभिनेता शाहरुख खानने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकी या सिनेमात शाहरुख खान झळकणार आहे. या सिनेमात तापसी पन्नू देखील झळकणार असून 22 डिसेंबर 2023 ला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
ADVERTISEMENT
शाहरुख खानने सोशल मीडियावर या सिनेमाची घोषणा करताना राजकुमार हिरानी यांना आपलं सांताक्लॉल म्हटलं आहे. पाहा काय म्हणाला आहे शाहरुख…
डंकी हा सिनेमा राजकुमार हिरानी, अभिजात जोशी आणि कनिका धिल्लाँन यांनी लिहीलेला असून राजकुमार हिरानी आणि गौरी खान या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमाविषयी बोलताना राजकुमार हिरानी म्हणाले, “माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत शाहरुख खानसोबत काम करावं अशी माझी नेहमी इच्छा होती. आतापर्यंत आम्ही अनेकदा एकत्र काम करण्याचे प्रयत्न केले, पण अखेरीस हा योगायोग डंकीच्या निमीत्ताने जुळून आला आहे.”
शाहरुख खाननेही राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करणं हे माझ्यासाठी गौरवास्पद असून राजु हिरानींसाठी मी डाँकी, मंकी काहीही बनायला तयार असल्याचं शाहरुख गमतीत म्हणाला.
या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून पुढचा भाग पंजाबमध्ये चित्रीत केला जाणार आहे. त्यामुळे शाहरुख-तापसी आणि पडद्यामागे राजकुमार हिरानी हे कॉम्बिनेशन पडद्यावर कसं जुळून येतं हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
ADVERTISEMENT