Shahrukh Khan अंडररेटेड अभिनेता, मी त्याला खुन्याच्या रोलमध्ये...काय म्हणाले महेश मांजरेकर?

महेश मांजरेकर हे एक वेगळ्या धाटणीचे चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी संजय दत्तसोबत 'वास्तव' हा चित्रपट बनवला ज्यामध्ये 'खलनायक' संजय दत्तची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दिसली होती. त्यानंतर अलीकडेच त्याने सलमान खानसोबत 'अंतीम' सुद्धा बनवला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

02 Mar 2025 (अपडेटेड: 02 Mar 2025, 12:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महेश मांजरेकर म्हणाले शाहरूख अंडररेडेट अभिनेता

point

"शाहरूखला मला खुन्याच्या भूमिकेत पाहायचंय"

Shahrukh Khan : 'किंग खान' शाहरुख खानच्या चित्रपटांचं रिलीज म्हणजे थिएटरमध्ये चाहते अक्षरश: दिवाळी साजरी करतात. शाहरूचे चित्रपट पाहण्यासाठी आणि त्यांना सुपरहिट करण्यासाठी हजारो चाहते थिएटरमध्ये येतात. या सुपरस्टारची जादूच लोकांना थिएटरकडे आकर्षित करते. चाहत्यांना त्याचा अभिनय इतका आवडतो की, काही लोक त्याच्यासारखी स्टाईल करतानाही दिसतात. पण काहींना असंही वाटतंय की शाहरुखला अजूनही मोठ्या पडद्यावर खूप काही करायचं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Walmik Karad जेलच्या ज्या बराकमध्ये आहे, तिथले CCTV बंद? दादासाहेब खिंडकर यांचे गंभीर आरोप

चित्रपट निर्माते-अभिनेते महेश मांजरेकर यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत शाहरुखच्या कौतुकात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान, मांजरेकर यांनी शाहरूखला अजूनही इंडस्ट्रीतील सर्वात 'अंडररेटेड अभिनेता' म्हटलं आहे. मांजरेकर म्हणाले, 'एक अभिनेता आहे ज्याला अभिनेता म्हणून खूपच कमी लेखले जाते पण मला वाटते की तो एक अद्भुत कलाकार आहे.' तो शाहरुख खान आहे. एक अभिनेता म्हणून तो उत्कृष्ट आहे. तो कॅमेऱ्यासमोर खूप सहज दिसतो.

महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, शाहरुख खानसाठी एका चित्रपटाची पटकथा तयार आहे, ज्यामध्ये त्यांना शाहरूखला हत्याऱ्याची भूमिका साकारताना पहायचंय. मांजरेकर म्हणाले 'एक खूप चांगला चित्रपट आहे, ज्यामध्ये मला त्याला खुन्याची भूमिका करताना पहायचं आहे.'

हे ही वाचा >>Dhananjay Munde : "धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार", फेसबूक पोस्टमुळे चर्चांना उधान

दरम्यान, शाहरुख खानने त्याच्या 30 वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत असंख्य भूमिका साकारल्या आहेत. शाहरूख त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेवर प्रयोग करताना दिसला आहे. दुसरीकडे, महेश मांजरेकर हे एक वेगळ्या धाटणीचे चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी संजय दत्तसोबत 'वास्तव' हा चित्रपट बनवला ज्यामध्ये 'खलनायक' संजय दत्तची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दिसली होती. त्यानंतर अलीकडेच त्याने सलमान खानसोबत 'अंतीम' सुद्धा बनवला होता. त्यामुळे ते जर शाहरूखसोबत चित्रपट करणार असतील, तर ती मेजवाणीच ठरेल.

    follow whatsapp