Ashatai Pawar Pandharpur : "शरद पवार आणि अजितदादांना एकत्र येऊदेत...", अजित पवार यांच्या आईचं विठुरायाकडे साकडं

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. ही इच्छा व्यक्त करणारे फक्त काही नेतेमंडळी होते असं नाही, तर पवार कुटुंबातील सदस्यही यामध्ये होते.

Mumbai Tak

मुंबई तक

01 Jan 2025 (अपडेटेड: 01 Jan 2025, 12:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आशाताई पवार पंढरपूरमध्ये

point

"शरद पवार-अजित पवार एकत्र यावेत"

point

अजित पवार यांच्या आईचं विठुरायाकडे साकडं

Ashatai Pawar : अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्रित यावेत अशी इच्छा व्यक्त करत अजित पवार यांच्या आईने थेट विठुरायाला साकडं घातलं आहे. गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात घडलेल्या सर्व घडामोडी ऐतिहासिक होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीसारख्या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली. याचे परिणाम राज्याच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली. मात्र, हे सर्व घडत असताना एकीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये असलेला संघर्ष राष्ट्रवादीत तेवढ्या प्रमाणात पाहायला मिळाला नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड अडकला कचाट्यात.. कोर्टाचा मोठा निर्णय, उशिरा रात्री काय-काय घडलं?

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. ही इच्छा व्यक्त करणारे फक्त काही नेतेमंडळी होते असं नाही, तर पवार कुटुंबातील सदस्यही यामध्ये होते. यापूर्वी रोहित पवार यांच्या आईने अशीच इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता स्वत: अजित पवार यांच्या आईनेही हीच इच्छा व्यक्त करत थेट विठुराययाकडे साकडं घातलं आहे. आशाताई पवार यांनी स्वत: याबद्दलच्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या.

हे ही वाचा >> Raj Thackeray : "विधानसभेत काय घडलं यावर माझं...", नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंची पोस्ट

आज नवीन वर्षाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार पंढरपूरमध्ये आल्या आहेत. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं आणि नंतर माध्यमांशी संवाद साधला. बोलताना त्यांनी पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब गुण्यागोविंदाने नांदावे असे आपण विठुरायाकडे साकडे घातले होते त्यांनी सांगितले.|

    follow whatsapp