पवार कुटुंबीयांच्या कंपन्यांवर IT च्या धाडीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई तक

• 01:57 PM • 07 Oct 2021

वसंत मोरे, बारामती आयकर विभागाने आज (7 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या काही नातेवाईकांच्या आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आणि घरावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. आता या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पवार यांनी थेट भाजपवरच निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीने लखीमपूर प्रकरणी ‘बंद’चं […]

Mumbaitak
follow google news

वसंत मोरे, बारामती

हे वाचलं का?

आयकर विभागाने आज (7 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या काही नातेवाईकांच्या आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आणि घरावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. आता या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पवार यांनी थेट भाजपवरच निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीने लखीमपूर प्रकरणी ‘बंद’चं आयोजन करण्यात आल्यानेच त्यातून संतापून ही कारवाई करण्यात आलेली असू शकते. असा दावा पवारांनी यावेळी केला आहे.

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

‘ही तर त्या संतापातून केलेली कारवाई’

बारामतीमध्ये शरद पवार यांच्याशी संवाद साधताना पवार म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशच्या घटनेवर माझ्यासह सर्व सहकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली होती. तेथे सात ते आठ शेतकऱ्यांना चिरडले गेले. अशी घटना यापूर्वी कधी घडली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध केला आहे. शेतकऱ्यांवर झालेला हल्ला हा जालियनवाला बागेसारखाच होता.’

‘याच हल्लाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चे आयोजन करण्यात आले. त्यातून संतापून ही कारवाई केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

‘हा सत्तेच्या अधिकाराचा अतिरेक’

‘आयकर भरण्यासंदर्भात संस्थांमध्ये काही शंका असतील तर त्या संदर्भात तपासणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र ज्यांच्या व्यवहाराची चौकशी करायची आहे, त्या व्यवहारात संबंध नसलेल्या कुटुंबातील मुलींच्यासुध्दा चौकशी करण्यात आल्या आहेत.’

‘मला असं वाटतं की, हा सत्तेच्या अधिकाराचा अतिरेक आहे. त्यामुळे लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे की, अशा प्रकारे अधिकारांचा गैरवापर आपण किती वेळा सहन करायचा.’

‘काही लोक आरोप करून, भाषण करून काहीही बोलतात. मात्र ते बोलल्यानंतर काही वेळातच केंद्रीय यंत्रणा कारवाई करण्यासाठी पुढे येतात. हे सगळ्यात आक्षेपार्ह आहे.’ असं म्हणत शरद पवारांनी भाजप आणि मोदी सरकारवर बरीच टीका केली आहे.

आयकर विभागाने राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यासह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवर देखील आज (7 ऑक्टोबर) अचानक छापे मारले.

अजित पवारांच्या तीनही बहिणींच्या घरावर आयकर विभागाचे छापे

  • अजित पवारांच्या ज्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे त्यापैकी सर्वात मोठ्या बहीण डॉक्टर रजनी इंदूलकर या पुण्यातील बावधन भागात राहतात. आज सकाळपासून इथे आयकर विभागाचे अधिकारी सुरक्षा रक्षकांसह पोहचले आहेत.

  • अजित पवारांच्या बहिण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्या गृहिणी असून त्यांचे पती डॉक्टर आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यात मोदी बाग सोसायटीतच राहतात. त्यांच्या घराच्या शेजारीच हे छापे सुरु आहेत.

  • तर विजया पाटील या कोल्हापुरात असतात. त्यांच्या घरी देखील आयकर विभागाने छापे मारण्यास सुरुवात केली आहे.

माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले? अजित पवार संतापले

नेमकं प्रकरण काय?

आयकर विभागानं आज सकाळच्या सुमारास एकाच वेळी राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर छापे टाकले. काही वेळाने ही बाब स्पष्ट झाली की, हे सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. तसंच अजित पवार यांच्या काही कंपन्यांवर देखील छापेमारी करण्यात आलेली आहे.

दुसरीकडे काही साखर कारखान्याचे संचालक यांना आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावलं आहे तर काही जणांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. कर चुकविल्याचा संशय असल्याने ही छापेमारी केल्याचं सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp