पत्राचाळ प्रकरण : विरोधकांवर कारवाया हाच भाजपचा महत्त्वाचा कार्यक्रम; शरद पवारांचा पलटवार

मुंबई तक

• 07:55 AM • 21 Sep 2022

शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आलेल्या पत्राचाळ भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलीये. भाजपकडून पत्राचाळ प्रकरणात नाव घेण्यात आल्यानंतर त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलंय. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचीही चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यांनी केलीये. भाजपकडून करण्यात आलेल्या या मागणीवर […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आलेल्या पत्राचाळ भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलीये. भाजपकडून पत्राचाळ प्रकरणात नाव घेण्यात आल्यानंतर त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलंय.

हे वाचलं का?

पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचीही चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यांनी केलीये. भाजपकडून करण्यात आलेल्या या मागणीवर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीये.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, “मला फारशी माहिती नाही. आजचा इंडियन एक्स्प्रेस वाचा. या एनडीएच्या कालखंडात ठराविक कालखंडात किती जणांवर केसेस केलेल्या आहेत. कोणत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांवर केलेल्या आहेत. सगळ्यांना मार्गदर्शन होईल असं वृत्त आहे.”

पत्रा चाळ भाजपच्या टार्गेटवर, शरद पवारांचं उत्तर

पुढे बोलताना पवार म्हणाले, “या देशात सामन्यांपुढचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला उद्याच्याला ज्या अपेक्षा आहेत निवडणुकीच्यानंतरच्या… त्याबद्दल आशंका मनात असेल, तर ती दूर करण्यासाठी अन्य पक्षांच्या लोकांवर खटले भरणं, चौकशा करणं. आदेश करणं, या सर्व गोष्टी महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून घेतल्या जात आहेत. त्याला राजकीयदृष्ट्या तोंड देत आहोत”, असं उत्तर शरद पवारांनी दिलं.

फॉक्सकॉन प्रोजेक्ट : विरोधाला विरोध ही माझी भूमिका नाहीये -शरद पवार

फॉक्सकॉन प्रोजेक्टबद्दल पवारांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली. “फॉक्सकॉन महाराष्ट्रात झाला असता, तर मला आनंद झाला असता. इथे जागाही ठरली होती. नव्या पिढीला काम करण्याची संधी मिळाली असती, त्यामुळे तो प्रोजेक्ट इथे होणं गरजेचं होतं. नाही झाला. गुजरातला गेला, ही गोष्ट मला मान्य आहे.”

पत्राचाळ घोटाळ्याला नवं वळण, संजय राऊतांच्या चार्जशीटमध्ये ईडीने केला शरद पवारांचा उल्लेख

पुढे बोलताना पवार म्हणाले, “देशात कुठेतरी प्रोजेक्ट होतोय. महाराष्ट्रात झाला असता, तर आनंद झाला असता. या देशात कुठेतरी होतोय, त्यामुळे विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नाही. राज्य सरकारनं गुंतवणुकीचं वातावरण तयार केलं पाहिजे. माझ्या काळात मला दोन तास गुंतवणुकदारांसाठी द्यावे लागायचे. त्यावेळी गुंतवणुकीसाठी वातावरण चांगलं होतं. आता त्यासाठी काम केलं पाहिजे”, असा सल्ला पवारांनी दिला.

    follow whatsapp