आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर आज शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासत असून, वरून बाळासाहेब बघत असतील, तर तेही म्हणत असतील की माझा मुलगा (उद्धव ठाकरे) शरद पवार आणि सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला, अशा शब्दात रामदास कदमांनी शरसंधान साधलं.
ADVERTISEMENT
कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादाला लागले आहेत, असं सांगतानाच महाविकास आघाडीसंदर्भात झालेल्या बैठकीतला किस्साही रामदास कदमांनी ऐकवला.
‘गुहागरचं माकड’; योगेश कदमांचं भास्कर जाधवांना प्रत्युत्तर, शिव संवाद यात्रेची उडवली खिल्ली
उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासताहेत; रामदास कदम नक्की काय म्हणाले?
‘ही सभा बाळासाहेब ठाकरे वरून बघत असतील आणि सांगत असतील की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चाल माझा तुला आशीर्वाद आहे, असं बाळासाहेब वरून सांगत असतील. उद्धवजी, सध्या राष्ट्रवादीची भांडी घासताहेत आणि त्यांचा मुलगा टून टून टून… खोका खोका करत उड्या मारतंय’, अशा शब्दात रामदास कदम यांनी ठाकरे पिता-पुत्रावर निशाणा साधला.
रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना दिला लग्न करण्याचा सल्ला
आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेतून बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना दिसत आहे. ‘५० खोके’चा उल्लेख आदित्य ठाकरे हे सातत्यानं करत असून, त्याला रामदास कदमांनी उत्तर दिलं. ‘त्याला (आदित्य ठाकरे) म्हणावं लग्न करून बघ. बायको आल्यावर संसार कसा असतो ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न करून बघ मग तुला कळेल संसार काय? मग खोके काय असतात ते कळेल’, असा टोला रामदास कदमांनी लगावला.
आता मातोश्रीची पायरी कधीच चढणार नाही -रामदास कदम
रामदास कदम म्हणाले, ‘जे शिवसेनाप्रमुखांनी कमावलं, ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. सगळं संपून टाकलं सगळं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय झाला. शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीवर होती. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा विषय आला.’
भरत गोगावलेंनी थेट उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य; ‘तेव्हाच शिवसेना भवनात बसले असते, तर…’
‘त्यावेळी मी उद्धवजींना सांगितलं की, शिवसेनाप्रमुखांनी अख्खं आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात घालवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करून शिवसेना उभी केली. त्यांच्यासोबत संसार मांडू नका. बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. ऐकलं नाही तिथून उठून आलो. तेव्हापासून आजपर्यंत मातोश्रीची पायरी चढलो नाही आणि आता कधीच चढणार नाही’, असं म्हणत रामदास कदमांनी ठाकरेंवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT