मुंबई: ‘महागाईचा फास कधी सुटणार आणि मोकळा श्वास कधी घेता येणार हा सध्या देशातील जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तिला हवे आहे. मात्र ते देण्याऐवजी, महागाईवर ‘उतारा’ करण्याऐवजी धार्मिक तणावाचा ‘क्लोरोफॉर्म’ देऊन जनतेला गुंगवून टाकण्याचे प्रयोग सुरू आहेत.’ असा थेट सवाल करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: ‘महागाईचा फास कधी सुटणार आणि मोकळा श्वास कधी घेता येणार हा सध्या देशातील जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तिला हवे आहे. मात्र ते देण्याऐवजी, महागाईवर ‘उतारा’ करण्याऐवजी धार्मिक तणावाचा ‘क्लोरोफॉर्म’ देऊन जनतेला गुंगवून टाकण्याचे प्रयोग सुरू आहेत.’ असा थेट सवाल करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.
पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
आधीच कोरोना महामारीमुळे देशातील नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न 1.26 लाखावरून 99 हजारांपर्यंत खाली आले आहे. त्यात न थांबणाऱ्या दरवाढीचे तडाखे जनतेला सहन करावे लागत आहेत.
-
पुन्हा ज्यांनी त्यापासून सामान्य माणसाला वाचवायचे ते या महागाईसाठी युक्रेन युद्ध आणि कच्च्या तेलाच्या जागतिक दरवाढीकडे बोट दाखवून हात वर करीत आहेत.
-
महागाईचा फास कधी सुटणार आणि मोकळा श्वास कधी घेता येणार हा सध्या देशातील जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तिला हवे आहे. मात्र ते देण्याऐवजी, महागाईवर ‘उतारा’ करण्याऐवजी धार्मिक तणावाचा ‘क्लोरोफॉर्म’ देऊन जनतेला गुंगवून टाकण्याचे प्रयोग सुरू आहेत.
-
कोरोना जशी आपली पाठ सोडायला तयार नाही, तशी महागाईदेखील पिच्छा सोडताना दिसत नाही. दिवसेंदिवस महागाईचा फास अधिकच घट्ट होत चालला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दरवाढीचा सिलसिला सुरू झाला आहे.
-
मार्च महिन्यात महागाईचा दर ‘रेकॉर्ड ब्रेक’ वाढला आहे. फेब्रुवारीत हा दर 13.11 टक्के होता. मार्च महिन्यात त्याने 14.55 टक्के इतकी उसळी मारली आहे.
-
किरकोळ महागाईचा दरदेखील 6.95 टक्के इतका वाढला आहे. मागील 17 महिन्यांतील किरकोळ महागाईचा हा उच्चांकी दर आहे. त्यावरून सामान्य माणसाचे महागाईने कसे कंबरडे मोडले आहे हे लक्षात येते.
-
केंद्रातील सरकारचे दावे काहीही असले तरी उन्हाप्रमाणेच महागाईच्या झळा सर्वसामान्य माणसाला चटके देत आहेत ही वस्तुस्थिती आहे. एक वर्षापूर्वी महागाई दर 7.89 टक्के होता, तो आता दुप्पट झाला आहे.
-
खाद्यपदार्थांचा घाऊक महागाई दरदेखील वाढला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांचे दर तर रोजच वाढत आहेत. त्यामुळे मालवाहतूक जशी महाग झाली आहे तशी प्रवासी वाहतूकदेखील महाग झाली आहे.
-
मालवाहतुकीतील दरवाढीने आधीच भडकलेल्या महागाईत आणखी तेल ओतले आहे. बाजारातील अशी एकही वस्तू किंवा सेवा नाही, जिचे दर काही टक्क्यांनी वाढलेले नाहीत.
-
कच्च्या तेलासोबतच खाद्यतेलाच्या किमतीही भडकल्या आहेत. भाज्या, फळफळावळ यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण पोटात चार घास तर गेलेच पाहिजेत ना? त्यामुळे काटकसरीची कसरत करीत सामान्य माणूस आला दिवस ढकलीत आहे.
-
हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दरही 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. लिंबाची दरवाढ तर एवढय़ा टोकाला गेली आहे की, ‘लिंबू’ हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे!
-
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना रेपो दर ‘जैसे थे’ ठेवले होते. त्यामुळे कर्जाचे व्याज, हप्ते वाढणार नाहीत, महागाईला ब्रेक लागेल असे सांगण्यात आले होते, मात्र तसे घडलेले नाही.
“शिवसेनेचं हिंदुत्वच ओरिजनल, बाकी सगळे….”
-
स्टेट बँकेने ‘एमसीएलआर’ दर वाढविल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. म्हणजे रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल न केल्याचा फायदा कर्जधारकांना मिळायला हवा होता तो आता मिळणार नाही. त्यात जीएसटीचा स्लॅबही 5 टक्क्यांवरून 8 टक्के करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
तूर्त तसे काही नसल्याचा खुलासा सरकारने केला असला तर उद्या तसे होणारच नाही याची काय खात्री? तसे झाले तर सरकारचे उत्पन्न वाढेल, पण महागाईच्या आगीत सापडलेला सामान्य माणूस नव्या दरवाढीच्या फुफाटय़ात सापडेल.
ADVERTISEMENT