‘सदा सरवणकरांनी न्यायालयाची दिशाभूल केली’; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

मुंबई तक

23 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:49 AM)

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली. २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत शिवाजी पार्कचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. हा निकाल देताना न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली. यावर शिवसेनेचे नेते अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली. अनिल परब म्हणाले,”१९६६ पासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. एक नेता, एक व्यासपीठ, […]

Mumbaitak
follow google news

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली. २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत शिवाजी पार्कचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. हा निकाल देताना न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली. यावर शिवसेनेचे नेते अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली.

हे वाचलं का?

अनिल परब म्हणाले,”१९६६ पासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. एक नेता, एक व्यासपीठ, एक झेंडा, एक जागा, असं समीकरण होतं. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिलीये. आमचा अर्ज आम्ही मुंबई महापालिकेकडे फार पूर्वी पाठवला होता. गेले काही दिवस त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नव्हता. यासंबंधात वारंवार विचारणा करण्यात आली. आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिका दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी आमचा अर्ज नाकारण्यात आला. हे काम इतकं पटकन केलं गेलं. त्यावर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं आहे”, असं म्हणत अनिल परबांनी मुंबई महापालिकेच्या निर्णयावर भाष्य केलं.

कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची आणि आमचीही -अनिल परब

“मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेसंदर्भात काही निरीक्षणं नोंदवली आहेत. न्यायालयाने पोलिसांनाही सूचना दिल्या आहेत. कारण कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम पोलिसांची जबाबदारी आहे आणि आमचीही जबाबदारी आहे. तसं आम्ही न्यायालयाला सांगितलं आहे”, असं अनिल परबांनी निकालानंतर म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी मैदान मारलं! शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

“२०१६ पासून राज्य सरकारच्या शासन आदेशाप्रमाणे ४५ दिवस हे वेगवेगळ्या कारणासाठी दिले जातात. त्यामध्ये दसरा मेळावा शिवसेनेच्या माध्यमातून घेतला जातो. २०१२ ते २०१६ या काळात आम्ही उच्च न्यायालयातून परवानगी मिळवून दसरा मेळावा साजरा केलाय. या सगळ्या गोष्टी न्यायालयासमोर ठेवल्या”, असं अनिल परब न्यायालयाच्या निकालानंतर म्हणाले.

शिवसेना दसरा मेळावा : सदा सरवणकर यांच्या याचिकेवर अनिल परब काय म्हणाले?

“दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की, दोन शिवसेना आहेत आणि आमच्या शिवसेनेकडे सगळे अधिकार आहेत आणि आम्हाला परवानगी मिळाली. पण न्यायालयाने सांगितलं की हे प्रकरण निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याबाबतीत जी काही दाद मागायची आहे, ती आपण तिकडे मागा. कोर्ट याचा विचार करणार नाही आणि त्यांची याचिका फेटाळली”, असं प्रतिक्रिया अनिल परबांनी दिली.

दुर्गाडी उत्सवात ठाकरे गटाला धक्का : दसरा मेळाव्यानंतर आणखी एक वाद न्यायालयात?

“उच्च न्यायालयाने २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर असा दसरा मेळाव्याचा कार्यक्रम करण्याची परवानगी दिलीये. महापालिकेचे जे काही आक्षेप होते, ते न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे दसरा मेळाव्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा साजरा केला जाईल”, असं अनिल परब म्हणाले.

    follow whatsapp