महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती आज राज्यात साजरी करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यभरात आज उत्साहाचं वातावरण आहे. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शिवजयंती साजरी करताना राज्य सरकारने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. तरीही मुंबईसह राज्यभरात आज शिवप्रेमी मोठ्या उत्साहात आजचा दिवस साजरा करत आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरही आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत गडावरील शिवाई देवीच्या मंदिरात महाअभिषेक व पुजा जाईल. कोरोनामुळे जमावबंदीचे नियम लक्षात घेता गडावर फक्त १०० लोकांनाच प्रवेश देण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील शिवजयंती निमीत्त शिवनेरी किल्ल्यावर पुष्पहार अर्पण करणार आहेत. राज्यात आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सरकारी नियम व अटींमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT