शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर, १०० दिवसांनी येणार तुरुंगाबाहेर

विद्या

• 07:46 AM • 09 Nov 2022

पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. मात्र आज १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळू नये असं ईडीने म्हटलं होतं. मात्र आज संजय राऊत यांना काही वेळापूर्वीच जामीन मिळाला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. आता तब्बल १०० दिवसांनी संजय […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. मात्र आज १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळू नये असं ईडीने म्हटलं होतं. मात्र आज संजय राऊत यांना काही वेळापूर्वीच जामीन मिळाला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. आता तब्बल १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. PMLA कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. इतके दिवस ते ऑर्थर रोड तुरुंगात होते.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. एकीकडे शिवसेना दुभंगली आहे. एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा सामना रोज रंगतो आहे. अशा सगळ्या घडामोडी घडत असताना संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. ३१ जुलैला संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती.

२ लाखांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत आणि त्यांचा भाऊ प्रवीण राऊत या दोघांनाही PMLA कोर्टाने पत्राचाळ घोटाळ्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. अंधेरीची पोटनिवडणूक, सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, दसरा मेळावा अशा अनेक गोष्टी घडल्या. आता या सगळ्या नंतर संजय राऊत यांचं बाहेर येणं महत्त्वाचं मानलं जातं आहे. संजय राऊत आता पहिल्यासारखेच धडाडणार की काही दिवस शांत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे काय म्हणाल्या आहेत?

आज खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं होतं की मै झुकुंगा नहीं. मी काहीही झालं तरी झुकणार नाही असं म्हटलं होतं. ते शेवटपर्यंत लढले. आज त्यांच्या भूमिकेचा विजय झाला आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आहे असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे

सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं आहे?

सुषमा अंधारे यांनी टायगर इज बॅक असं म्हणत ट्विट केलं आहे.सुषमा अंधारे या शिवसेनेतल्या फायर ब्रांड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आता त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच सूचक आहे।

कोर्टात काय सुरू आहे?

कोर्टामध्ये ईडीने या जामीनाला विरोध दर्शवला आहे. त्यासाठीचा युक्तिवाद ईडीतर्फे करण्यात येतो आहे. जामिनाचा आदेश बाहेर आल्यानंतर तो ऑर्थर रोड जेलच्या बॉक्समध्ये जावा लागेल. तो तुरूंग प्रशासनाला मिळाला तरच संजय राऊत हे बाहेर येऊ शकणार आहेत. त्यामुळे सरतेशेवटी कोर्टात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp