शिवसेनेचे पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार राजेंद्र गावित यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पालघर येथील जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने खासदार गावित यांना एक वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे. जागेच्या व्यवहारात आर्थिक देवणा-घेवाणीदरम्यान खासदार गावित यांनी दिलेला चेक बाऊन्स झाल्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?
२०१४ साली राजेंद्र गावित यांनी व्यवसायिक चिराग किर्ती बाफना यांच्याकडून १ कोटी रुपये घेतले होते. जमिनीच्या व्यवहारासंदर्भात गावित आणि व्यवसायिक चिराग बाफना यांच्यात एक करार झाला होता. परंतू हा व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे चिराग बाफना यांनी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला होता.
या खटल्यात सुनावणीदरम्यान २०१९ मध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये सामंजस्याने हे प्रकरण निकाली काढण्यावर एकमत झालं. यानंतर खासदार गावित यांनी बाफना यांना अडीच कोटींची रक्कम ७ चेकच्या माध्यमातून देण्याचं मान्य केलं.
गडचिरोलीमध्ये दोन नगर पंचायतींवर फडकला शिवसेनेचा भगवा
यातला एक कोटींचा चेक पास झाल्यानंतर खासदार गावित यांचे २५ लाखांचे उर्वरित सहा चेक बाऊन्स झाल्यानंतर बाफना यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली होती. ज्यावर न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली आहे. खासदार गावित यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात खासदार गावित यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. पोटनिवडणुकीत निष्टावंत कार्यकर्त्यांना डावलून मुलगा रोहन गावित याला तिकीट दिल्यानंतर निवडणुकीत रोहन गावितला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर आता राजेंद्र गावित काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जुन्या मित्राला सोबत घेऊन शिवसेनेने शिकवला काँग्रेसला धडा, यवतमाळमध्ये सेना-भाजपची युती
ADVERTISEMENT