वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत असताना संजय राऊतांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंना आता राऊतांनीही जशास तसं उत्तर दिलं आहे. नक्कल ही मोठ्या माणसांचीच केली जाते. आमचं राजकारण हे नकलांवर चालत नाही असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत खूप बोलतात असं राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रीया विचारली असता संजय राऊत म्हणाले, “मग त्यांनी बोलावं, सगळ्यांनीच बोलायला हवं अशी परिस्थिती सध्या आहे. ईडीने आम्हाला बोलावलं म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही बोलत राहणार कारण आम्ही कोणालाही मिंधे नाहीत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, इथे डुप्लिकेट-नकली असं काहीच नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आमचं राजकारण नकलांवर चालत नाही ते संघर्षावर उभं आहे”.
चॅनल लागले की हे सुरु मग इतर वेळी….संजय राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंनी उडवली खिल्ली
मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाबद्दल राज यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत संजय राऊतांनी काही लोकं ही आजारी नसतानाही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्यांइतक सक्रीय कोणीच नाही. ते सक्रीय आहेत म्हणूनच राज्य पुढे चालतंय असं म्हणत राज यांना टोला लगावला.
पाच राज्यांच्या निवडणुकाचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीवर जाऊ नका. जी प्रमुख राज्य आहेत तिकडे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण असल्याचंही संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT