Sanjay Raut: "आम्ही स्वबळावर..काय होईल ते होईल...", संजय राऊतांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार

Sanjay Raut On Vijay Wadettiwar : जागावाटपाच्या घोळामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं खळबळजनक विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

संजय राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे (फाइल फोटो)

संजय राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे (फाइल फोटो)

योगेश पांडे

11 Jan 2025 (अपडेटेड: 11 Jan 2025, 09:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

point

"ते विष्णूचे तेरावे अवतार आहेत. ज्यांना अवतार मानलं..."

point

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On Vijay Wadettiwar: जागावाटपाच्या घोळामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं खळबळजनक विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. "महाराष्ट्रात काही लोक कोट शिऊन तयार होते मुख्यमंत्री व्हायला..आम्ही नव्हतो त्यामध्ये..शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे. प्रादेशिक पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. पश्चिम बंगालला शिवसेना होती का? अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतोय? असा थेट सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला केला आहे. आघाडीत समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते. आघाडीत ही भूमिका जे स्वीकारत नाहीत, त्यांना आघाडीत राहण्याचा अधिकार नसतो. 

हे वाचलं का?

शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार - संजय राऊत 

मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. एकदा आम्हाला आजमंवायचच आहे. नागपूरला सुद्धा स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. आमचं असं ठरतंय की, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीत लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावेत, अशी मोठी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case MCOCA : संतोष देशमुख प्रकरणात मकोका दाखल, पण वाल्मिक कराड मात्र...

'माझ्याकडून चूका होतात. मी सुद्धा माणूस आहे. देव थोडी आहे..',असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्टमध्ये नुकतच केलं होत. त्यानंतर संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, "मी त्यांना माणूस मानत नाही..ते देव आहेत. देव देव असतो. एकदा कुणी घोषित केलं की, ते देवाचं अवतार आहेत, मग माणूस कसं होतील? विष्णू भगवान आहेत. ते विष्णूचे तेरावे अवतार आहेत. ज्यांना अवतार मानलं आहे, मग ते स्वत:च बोलतात मी माणूस आहे. म्हणजे काहीतरी गडबड आहे. केमिकल लोचा आहे". 

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : "शरद पवार चाणक्य, म्हणून...", पवारांनी RSS चं कौतुक केल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

भाजपवर टीका करत संजय राऊत पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी असं स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भाजपच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्री असाल, तर तुम्ही भाषणात काय बोलले याला अर्थ नाही. जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन पूर्ण करावं लागेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील.

    follow whatsapp