मुंबईतल्या माहिम या भागात असणाऱ्या शोभा हॉटेलमधे काम करणारे १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने हे हॉटेल सील करण्यात आलं आहे. या हॉटेलमध्ये एकूण २५ कर्मचारी काम करतात. त्यापैकी एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ज्यानंतर मुंबई महापालिकेने सगळ्यांची चाचणी केली. सगळ्यांची चाचणी केल्यानंतर त्यातले १० जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे हॉटेल सील करण्यात आलं आहे. माहिमच्या L J रोडवर हे हॉटेल आहे. हे हॉटेल मुंबईतल्या प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक आहे. या हॉटेलमधल्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली अशी माहिती समोर आली ज्यानंतर या हॉटेलमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चाचणाी करण्यात आली. ज्यामध्ये १० जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत आज दिवसभरात ९ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत आणि महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. महाराष्ट्रात तर ४९ हजारांपेक्षा जास्त रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात लॉकाडऊन लावण्याचा विचार ठाकरे सरकारकडून केला जातो आहे. कारण कोरोना प्रतिबंधाचे कोणतेही नियम पाळताना लोक दिसत नाहीयेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी शुक्रवारी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो असेच संकेत दिले आहेत.
मास्क न लावण्यावरुन मुख्यमंत्री संतापले, नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं!
मास्क लावणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ही त्रिसूत्री पाळताना अनेक नागरिक दिसत नाहीत. मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून दंडही वसुल केला जातो आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात मास्क न लावणाऱ्या लोकांकडून थोडा थोडका नाही तर ५० कोटींचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तरीही मुंबईकर म्हणावी तशी काळजी घेताना दिसत नाहीत.
नाईट कर्फ्यूच्या नावाखाली हॉटेल्स बंद करणं हा अन्याय, संजय निरूपम यांची ठाकरे सरकारवर टीका
हॉटेल व्यावसायिकांनी शुक्रवारीच लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लावू नये म्हणून आंदोलन केलं होतं. आता मात्र मुंबईतल्या प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक असलेल्या शोभा हॉटेलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे हे समोर आलं आहे. तूर्तास हॉटेल सील करण्यात आलं आहे. आता कोरोना आणखी काय काय गोष्टी समोर आणतो मुंबईसह राज्यात काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT