सरकारी रुग्णालयात सहा दिवसांच्या नवजात बाळाची 90 हजार रुपयांना सौदा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर शहरातील केंद्रीय सरकारी रुग्णालयाच्या आवारात ही धक्कादायक घटना घडली. मुलीच्या पालकांनी त्यांच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती खराब असल्याचं कारण देत थेट आपल्या पोटच्या गोळ्याचाच सौदा केल्याचं समोर आलं. नवजात बाळाच्या आजीच्या तक्रारीवरून, पालक, मध्यस्थ महिला आणि बाळाला खरेदी करण्यासाठी आलेल्या आरोपींवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन पुरुषांना अटक केली असून, तीन महिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ajit Pawar Beed : कमरेला कट्टे लावून फिरणाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम, बाजूला मुंडे उभे असताना म्हणाले...
तक्रारदार विजया गायकवाड या उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील मराठा सेक्शन परिसरात राहतात. त्यांना दोन मुलं असून, त्यापैकी विशाल हा मोठा मुलगा आहे. 22 जानेवारी रोजी उल्हासनगर शहरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये विशालच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. 25 जानेवारी रोजी विशालची आई नवजात बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात आली तेव्हा आरोपी मुलाने सांगितलं की, नवजात मुलगी 90 हजार रुपयांना विकली आहे. नवजात बाळाची आजी विजया हिने बाळाला परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि विशालला मोलमजुरीने पैसे परत करून बाळाला परत आणण्यास सांगितलं.
हे ही वाचा >> Dhule Ganja News : बाहेरून ज्वारी, आतमध्ये गांजा.... पोलिसांनी छापा टाकला, 76 लाखांचा गांजा जप्त
आरोपी मध्यस्थ महिलेने नवजात बाळाला शेख कुटुंबाला विकण्यात आल्याचं सांगितलं. बाळाला विकत घेणाऱ्या शेख दाम्पत्याला गेल्या 18 वर्षांपासून मूल नव्हतं. दरम्यान, या प्रकरणी वरीष्ठ पोलीस मुलीचे निरीक्षक शंकर आवताडे म्हणाले, शेख पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
