सोलापुरात रेमिडेविसीर इंजेक्शनसाठी मेडीकलबाहेर रांगा

मुंबई तक

• 02:37 AM • 07 Apr 2021

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता आरोग्य यंत्रणेवरही चांगलाच ताण जाणवतो आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये औषधांचा आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवतो आहे. सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमिडेविसीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. आपल्या रुग्णांसाठी इंजेक्शन घेण्यासाठी सोलापूर शहरात मेडीकल बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. सोलापुरातील नावाजलेल्या हुमा मेडीकल दुकानाबाहेर नागरिकांनी […]

Mumbaitak
follow google news

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता आरोग्य यंत्रणेवरही चांगलाच ताण जाणवतो आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये औषधांचा आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवतो आहे. सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमिडेविसीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. आपल्या रुग्णांसाठी इंजेक्शन घेण्यासाठी सोलापूर शहरात मेडीकल बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.

हे वाचलं का?

सोलापुरातील नावाजलेल्या हुमा मेडीकल दुकानाबाहेर नागरिकांनी रात्री ९ वाजेपासून रांगा लावल्या होत्या. १२ वाजता इंजेक्शनचा स्टॉक येणार असल्यामुळे आपल्या नातेवाईकांना योग्य वेळेत इंजेक्शन मिळावं आणि यात उशीर होऊ नये यासाठी अनेक लोकं ३-४ तास रांगेत उभी होती. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर दिवसेंदिवस ताण येताना दिसतो आहे. शासकीय रुग्णालयात औषधसाठा पुरेसा असला तरीही रेमिडेविसीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यामुळे सोलापुरात बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय.

‘ब्रेक द चेन’ ला सरकारमधून विरोध, अमरावतीत निर्बंध शिथिल करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती फारच गंभीर असल्याचं दिसून येतंय. कारण काल (6 एप्रिल) पुन्हा एकदा राज्यात तब्बल 55 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 55 हजार 469 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 297 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे सध्या राज्यात 4 लाख 72 हजार 283 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात काल 34,256 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 25,83,331 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.98 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 277 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.81 टक्के एवढा आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होईना, दिवसभरात किती नवे रुग्ण सापडले?

    follow whatsapp