श्रद्धा वालकरला का मारलं? : न्यायाधीशांच्या प्रश्नाला आफताबने काय उत्तर दिलं?

मुंबई तक

22 Nov 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:02 AM)

दिल्ली : संपूर्ण देशाला हदरवणाऱ्या बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज झालेल्या विशेष सुनावणीदरम्यान अफताबने श्रद्धा वालकरची हत्या रागाच्या भरात केल्याचं न्यायाधीशांना सांगितलं. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात काय घडलं? […]

Mumbaitak
follow google news

दिल्ली : संपूर्ण देशाला हदरवणाऱ्या बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज झालेल्या विशेष सुनावणीदरम्यान अफताबने श्रद्धा वालकरची हत्या रागाच्या भरात केल्याचं न्यायाधीशांना सांगितलं.

हे वाचलं का?

आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात काय घडलं?

इंडिया टुडेशी संबंधित हिमांशू मिश्रा यांच्या वृत्तानुसार, आफताब न्यायालयात न्यायाधीशांसमोर म्हणाला, “जो भी हुआ वो गुस्से में हो गया.”

आज न्यायालयात अफताबने आपण पोलिसांना तपासकामात मदत करत असून सर्व माहिती देणार असल्याचं सांगितलं. तसंच आपण श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कोठे फेकले याची माहिती पोलिसांना दिली आहे. पण या घटनेला बराच काळ लोटला असल्यानं संपूर्ण घटनाक्रम आठवणं कठीण जात असल्याचेही त्यानं न्यायालयाला सांगितलं.

आफताबच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, त्याने हत्यार कोणत्या दुकानातून आणलं हे आठवत नाही. ज्या तलावात त्याने श्रद्धाचे डोके फेकले गेले त्याचा नकाशाही त्याने तयार केला आहे.

Shraddha murder case: आफताबच्या घराच्या बाथरूममध्ये आढळलं रक्त, फॉरेन्सिक टीमचा मोठा खुलासा

आफताबची पॉलीग्राफ चाचणी होणार :

दरम्यान, या सर्व खटल्याच्या अनुषंगाने आफताबची पॉलीग्राफ चाचणीही करण्यात येणार आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना त्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आफताब चुकीची माहिती देत ​​तपास वळवत असल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं. मागील आठवड्यात न्यायालयाने नार्को चाचणीलाही परवानगी दिली होती.

Bumble डेटिंग अॅपवर भेटले होते श्रद्धा आणि आफताब

Bumble या डेटिंग अॅपवर श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला या दोघांची ओळख झाली होती. २०१८ मध्ये या दोघांची ओळख झाली. डेटिंग अॅपच्या माध्यमातून २०१९ ला दोघं भेटले. त्यानंतर लिव्ह इन मध्ये राहात होते.

Shraddha Murder Case : 10 तासांत श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबने बिअर घेतली अन्…

या दरम्यान, पोलिसांनी जी माहिती या प्रकरणात दिली आहे त्यानुसार या दोघांमध्ये अलिकडे भांडणं वाढली होती. या दोघांनाही एकमेकांवर संशय होता. आफताबला वाटत होतं की श्रद्धाच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे. तर श्रद्धा हा दावा करत होती की आफताबच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलं आहे. याच वादातून आफताबने १८ मे २०२२ ला श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अफताबने अनेक पद्धतींनी प्रयत्न केले. आधी मृतदेहाचे 30 पेक्षा जास्त तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. पुढचे अनेक दिवस ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकत राहिला. अलिकडेच सहा महिन्यांपासून श्रद्धाचा काहीच पत्ता नसल्याचं, तिची सोशल मिडियावरील अनुपस्थिती लक्षात येताच 10 नोव्हेंबरला श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीवरून चौकशी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

    follow whatsapp