Sidhu Moose Wala Death : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवालावर एएन ९५ रशियन रायफलने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शींनीही महत्त्वाची माहिती दिलीये.
ADVERTISEMENT
रविवारी सायंकाळी पंजाब हादरला. सुरक्षा काढून घेण्यात आलेल्या सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबमधील गँगवॉरमध्ये पहिल्यांदाच एएन-९४ चा वापर करण्यात आला आहे. जवळपास ८ ते १० जणांनी हा हल्ला केला होता, अशीही माहिती समोर आलीये.
सिद्धू मुसेवालाची हत्या झाली, त्यावेळी तिथे असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने घटनाक्रम सांगितला. याच प्रत्यक्षदर्शीने सिद्धू मुसेवालाला गाडीतून बाहेर काढलं होतं. मेसी नाव असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दावा केलाय की, ज्यावेळी सिद्धू मुसेवालाला गाडीतून बाहेर काढलं. त्यावेळी तो जिवंत होता.
‘आजतक’शी बोलताना मेसी म्हणाला, ‘जेव्हा हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवालावर गोळीबार केला. त्यावेळी सर्वात आधी मीच घटनास्थळी पोहोचलो होतो. मुसेवालासोबत आणखी दोन व्यक्ती होत्या. ते लोक गाडीत बसलेले होते.’
‘मी बघितलं की, सिद्धू मुसेवालाला गोळ्या लागल्या होत्या. पण, तो श्वास घेत होता. मी सिद्धू मुसेवालाला गाडीतून बाहेर काढलं. दुसऱ्या गाडीत टाकलं आणि रुग्णालयात पाठवून दिलं,’ असं मेसी याने सांगितलं.
एएन-९४ ने हल्ला
सिद्धू मुसेवालावरील हल्ल्यासाठी एएन-९४ या रायफलचा वापर करण्यात आला. घटनास्थळी एएन९४ रायफलच्या तीन गोळ्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर या हल्ल्यात आठ ते दहा लोक सहभागी होते, अशीही माहिती समोर आली आहे. सिद्धू मुसेवालावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. जवळपास ३० राऊंड फायर करण्यात आले.
मेसीने सांगितलं की, गाडीत सिद्धू मुसेवालाबरोबर जे दोन लोक बसलेले होते. त्यांनाही गोळ्या लागल्या. सिद्धू मुसेवालाच्या गाडीवर (महिंद्रा थार) ३५ ते ४० राऊंड फायर केले गेले होते. तिथे भिंतीवरही गोळ्यांच्या खुणा आहेत.
सिद्धू मुसेवालाची हत्या का झाली?
सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यातील त्याच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबचे पोलीस महासंचालक व्ही.के. भावरा यांनी सांगितलं की, ‘सिद्धू मुसेवाला जेव्हा त्याच्या घरातून निघाला, तेव्हा रस्त्यात दोन गाड्या मागून व दोन गाड्या समोरून आल्या आणि त्यांनी गोळीबार केला.’
‘सिद्धू मुसेवालाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. सिद्धू मुसेवाला याची जुन्या वादातून हत्या करण्यात आली, असंच सध्या दिसतंय. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य लक्कीने याने घेतली आहे. तो सध्या कॅनडामध्ये आहे,’ असं ते भावरा यांनी सांगितलं.
‘बिश्नोई गँगच्या विरोधी गटाला सिद्धू मुसेवालाचं समर्थन करत होता. त्यामुळे सिद्धू मुसेवाला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होता, अशी माहितीही समोर आलीये. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या काडतुसांवरून हल्ल्यासाठी तीन वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असावा, असं पोलीस महासंचालक म्हणाले.
ADVERTISEMENT