देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. रूग्णसंख्या पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारने रविवारी कडक नियम जारी केलेत. यामध्ये रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीये. त्याचप्रमाणे होम डिलिव्हरी तसंच अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून सरकारी कार्यालयं 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यात आलीयेत. दरम्यान याच मुद्द्यावर छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आक्षेप घेतला आहे.
ADVERTISEMENT
ये है मोहोब्ब्ते फेम अभिनेता करण पटेलने सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या या निर्बंधांवर नाराजी व्यक्ती केलीये. करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत संताप व्यक्त केला. “अभिनेते त्यांच्या प्रोजेक्टससाठी शूटींग करु शकतात. क्रिकेटर्स त्यांचा खेळ सुरु ठेवत सामने शकतात. इतकंच नाही तर राजकीय नेते प्रचारसभा देखील काढू शकतात. मात्र यामध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती कामाला जाऊ शकत नाही”
करण पटेलप्रमाणे अभिनेता नकुल मेहताने कोरोनाच्या नियमांवर ताशेरे ओढले आहेत. दिल्ली हायकोर्टाने एकट्या व्यक्तीने गाडी चालवताना देखील मास्क लावणं बंधनकारक असल्याच्या ट्विटवर लिहीत आपलं मत मांडलं आहे. मास्क लावण्याच्या मुद्द्यावर नकुल म्हणतो, “राजकीय नेत्यांच्या रॅलीला (मास्क) नाही, बॉलिवूडच्या अवॉर्ड शोला (मास्क) नाही, कुंभ मेळाव्याला (मास्क) नाही. मात्र एकट्या व्यक्तीने गाडी चालवणाऱ्याला मात्र मास्क बंधनकारक आहे.”
दरम्यान या दोन्ही अभिनेत्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी बैठक घेऊन राज्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. राज्यात 5 एप्रिलपासून कडक नियम लागू केले असून आवड्याच्या अखेरीस संपूर्ण लॉकडाउन करण्यात येणारे.
ADVERTISEMENT