अमरावती : जन्मदात्या पित्याची मुलाने दगडाने ठेचून केली हत्या

मुंबई तक

• 07:21 AM • 10 Feb 2022

– धनंजय साबळे, अमरावती प्रतिनिधी मनोरुग्ण मुलाच्या उपचारासाठी राजस्थानला गेले असताना, मुलाने आपल्याच वडीलांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. हे कुटुंब अमरावती जिल्ह्यात राहणारं होतं. राजस्थानच्या मेंहदीपूर येथील बालाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैरव मंदिरात जाताना तीन पहाडी भागात वर्दळ नसलेल्या ठिकाणी मुलाने बापाची हत्या केल्याचं कळतंय. अमरावतीच्या लक्ष्मीनगरात टाकरखेडे कुटुंब आपल्या एकुलत्या एक मुलासोबत राहतं […]

Mumbaitak
follow google news

– धनंजय साबळे, अमरावती प्रतिनिधी

हे वाचलं का?

मनोरुग्ण मुलाच्या उपचारासाठी राजस्थानला गेले असताना, मुलाने आपल्याच वडीलांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. हे कुटुंब अमरावती जिल्ह्यात राहणारं होतं. राजस्थानच्या मेंहदीपूर येथील बालाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैरव मंदिरात जाताना तीन पहाडी भागात वर्दळ नसलेल्या ठिकाणी मुलाने बापाची हत्या केल्याचं कळतंय.

अमरावतीच्या लक्ष्मीनगरात टाकरखेडे कुटुंब आपल्या एकुलत्या एक मुलासोबत राहतं होतं. आपल्या मनोरुग्ण मुलावर उपचार करण्यासाठी वडील विष्णुपंत टाकरखेडे मुलगा अभिषेकला घेऊन राजस्थानला गेले होते. यावेळी ८ फेब्रुवारीला वडील आपल्यावर तंत्रमंत्र करणार असल्याशी शंका आल्यामुळे अभिषेकने हे कृत्य केल्याचं कळतंय. बुधवारी विष्णुपंत टाकरखेडे यांचा मृतदेह अमरावतीत आणण्यात आला.

पिस्तुल आणि गुप्तीच्या धाकाने विवस्त्र करून अश्लील कृत्य करायला लावायची टोळी, चौघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा मनोरुग्ण असल्याचं कळतंय. त्याच्यावर उपचार करण्यासाठी विष्णूपंत आपली पत्नी हेमलता आणि गाडीचा चालक विजय याच्यासोबत राजस्थानला गेले होते. मंदिरात देवदर्शन करुन झाल्यानंतर ८ फेब्रुवारीला ते तीन पहाडी भागातील भैरव मंदिरात दर्शनाला गेले होते. तिथे माझ्यावर अकारण तंत्र-मंत्र करता का, असे म्हणत अभिषेकने दगडाने ठेचून विष्णुपंत यांना ठार केलं. अभिषेकचा रुद्रावतार पाहून घाबरुन गेलेल्या पत्नी हेमलता आणि चालक विजय यांना अभिषेकला थांबवण्याची हिंमतही झाली नाही.

राजस्थानमधील बालाजी पोलिसांनी प्रभारी ठाणेदार गिरीराज यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अभिषेकला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली. मला कसलाही आजार नाही. मात्र, मनोरुग्ण समजून होत असलेल्या उपचारांमुळे मी त्रस्त झालो होतो. त्यातून ही घटना घडली, असे त्याने पोलिसांना सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह हेमलता व विजय यांनी रुग्णवाहिकेतून बुधवारी साडेअकरा वाजता घेऊन अमरावतीत लक्ष्मीनगर येथे आणला.

पुण्यात पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या

    follow whatsapp