Omicron South africa Variant Update: दक्षिण अफ्रिकेत ज्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शोध लावला आहे त्यांनाच आता जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा (Cyril Ramaphosa) यांनाही यासंदर्भातील पत्र पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेच्या संडे टाइम्स या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी धमकी देणाऱ्या लोकांची आता चौकशी सुरू केली आहे. या पत्रात धमकी देणाऱ्यांनी लिहिले आहे की, वैज्ञानिकांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.
वास्तविक, याबाबतचे पत्र दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनाही पाठवण्यात आले होते, त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीच्या पत्रात ग्लेंडा ग्रे आणि प्रोफेसर तुलिओ डी ऑलिव्हेरा यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. तुलिओ डी ऑलिव्हेरा हे क्वाजलू नेटल रिसर्च इनोव्हेशनचे प्रमुख आहेत.
लसीकरण झालेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचेही आभार मानले, ज्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल हे लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, महत्त्वाची बाबा ही आहे की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, असं असताना देखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरातल्या अनेक देशांची काळजी वाढवली आहे. जगभरात हा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
WHO ने ओमायक्रॉन या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत टाकलं आहे. या व्हेरिएंटबाबत UK च्या वैज्ञानिकांनी एक रिपोर्ट सादर केला आहे.
ज्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की जर या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले नाहीत तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे 25 ते 75 हजार मृत्यू होऊ शकतात. लंडन येथील स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण अफ्रिकेच्या स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.
ADVERTISEMENT