ADVERTISEMENT
सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिरात आज खास सजावट करण्यात आली होती.
पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधून कुणकेश्वर मंदिर देवस्थानने 7500 आंब्यांची आरास केली होती.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला त्याला आज 75 वर्षे पूर्ण स्वतंत्र करून शतकाकडे वाटचाल करत आहोत याच उद्देशाने 75 ×100 याप्रमाणे 7500 आंब्यांची आरास कुणकेश्वर मंदिरात शनिवारी करण्यात आली होती.
देवगड हापूस आंब्याने केलेल्या या सजावटीमुळे कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याला एक वेगळच रुप प्राप्त झालं होतं.
शनिवारचा दिवस असल्यामुळे आज मंदिरात पर्यटकांची चांगलीच गर्दी होती.
उपस्थित भाविकांना नंतर याच आंब्यांचा प्रसाद दिला जातो.
ही सजावट पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी भाविक या मंदिराला भेट देत असतात.
ADVERTISEMENT