लालपरी ठप्प! वारकऱ्यांना विठूरायाचं दर्शन घडवण्यासाठी रेल्वे धावली मदतीला

मुंबई तक

• 04:58 AM • 14 Nov 2021

राज्यभर सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संपामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीला ब्रेक लागला आहे. दिवाळी सर्वसामान्यांची फजिती झाल्यानंतर कार्तिक यात्रा तोंडावर आली असून, संप सुरूच आहे. त्यामुळे पंढरपुरला कशाने जायचं असा यक्षप्रश्न पडलेल्या वारकऱ्यांना विठूरायाचं मुखदर्शन घडवण्यासाठी रेल्वे धावून आली आहे. पंढरपुर यात्रेला येणारे भाविक हे मोठ्या प्रमाणात एसटीने येतात. मात्र, गेली दोन वर्ष यात्रा बंद […]

Mumbaitak
follow google news

राज्यभर सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संपामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीला ब्रेक लागला आहे. दिवाळी सर्वसामान्यांची फजिती झाल्यानंतर कार्तिक यात्रा तोंडावर आली असून, संप सुरूच आहे. त्यामुळे पंढरपुरला कशाने जायचं असा यक्षप्रश्न पडलेल्या वारकऱ्यांना विठूरायाचं मुखदर्शन घडवण्यासाठी रेल्वे धावून आली आहे.

हे वाचलं का?

पंढरपुर यात्रेला येणारे भाविक हे मोठ्या प्रमाणात एसटीने येतात. मात्र, गेली दोन वर्ष यात्रा बंद होती. यंदा यात्रेला परवानगी देण्यात आली, पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं विठूभक्तांची मोठी अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेनं कार्तिकीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठी 7 नव्या रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या महामारीत राज्यात कोणत्याही मोठ्या यात्रेला परवानगी नव्हती. मात्र यंदा सर्वत्र मंदिरे सुरू झाली आहेत. त्यातच पंढरपूर कार्तिकी यात्रेलाही सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. वारीसाठी रेल्वेनं 3 लाखांहून हजारांहून अधिक भाविक पंढरपुरात येतील, असा अंदाज प्रशासनच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. यामुळे 7 नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

कार्तिकी यात्रेसाठी ‘लातूर -पंढरपूर’, ‘मिरज -पंढरपूर’, ‘लातूर – मिरज’, ‘मिरज- लातूर’, ‘बिदर- पंढरपूर-मिरज’, ‘आदिलाबाद- पंढरपूर’, ‘नांदेड- पंढरपूर’ आणि ‘सांगली -पंढरपूर’ या नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

कार्तिकीच्या तोंडावर एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहणार असल्याने वारीवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्केच वारी भरेल अशी शक्‍यता आहे. यात्रेदरम्यान रेल्वेवर वारकऱ्यांचा अधिकचा भार पडणार हे गृहीत धरुन रेल्वे विभागानेही तयारी पूर्ण केलीय. तिकीट आरक्षणाच्या आणखी 4 खिडक्‍या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच वारकरी हे ग्रामीण भागातील असतात त्यांना लिहण्यावाचण्यास अडचण होते म्हणून अनारक्षित खडकीही उघडण्यात आली आहे.

    follow whatsapp