मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. कोर्टाने वाझे यांची कस्टडी २५ मार्चपर्यंत NIA कडे दिली आहे. अंबानीच्या घरासमोरील स्कॉर्पिओ ही ज्या मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती त्यांचा मृतदेहही मुंब्रा खाडीत सापडल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. १७ फेब्रुवारीला हिरेन यांची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेली होती. ज्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली होती.
ADVERTISEMENT
अंबानीच्या घरासमोरील स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या काळात ही स्कॉर्पिओ कार नेमकी कुठे होती, ती कोण वापरत होतं, याबद्दल वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. एनआयए तसंच एटीएसचे अधिकारीही याचाच तपास करत आहेत. याबद्दल आता NIA च्या अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
ही स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझे यांच्या ताब्यात असल्याचा संशय NIA आणि ATS च्या अधिकाऱ्यांना आहे. सचिन वाझे यांनी ही कार आपल्या सोसायटीच्या आवारात ठेवल्याचा संशयही तपासयंत्रणांना आहे. सचिन वाझे हे ठाण्यात राहतात, त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा सध्या वाझे यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, वाझेंशी माझी दुष्मनी नाही पण…
सचिन वाझे यांचा परिवार गेल्या आठवडाभरापासून घरी नाहीये. ठाणे पोलिसांच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांच्या राहत्या घरी जाऊन पाहणीही केली…परंतू वाझे यांचं घर बंद असल्याचं कळतंय. त्यामुळे याप्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
‘त्या’ इनोव्हा कारबाबत नवी माहिती समोर, वाझेंच्या अडचणी वाढणार?
दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीसोबतच एक इनोव्हा कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती. ही इनोव्हा कार क्राईम ब्रांचच्या सीआययू युनिटचीच असल्याची माहिती क्राईं ब्रांचमधील एका अधिकाऱ्याने दिली आहे. 25 फेब्रुवारीच्या घटनेनंतर हीच इनोव्हा कार मुलुंडच्या टोलनाक्याहून बाहेर पडताना दिसली. जी सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील पाहायला मिळाली होती. क्राईम ब्रांच सूत्रांच्या मते, इनोव्हा कार ही मुंबई पोलीस मोटर ट्रांसपोर्ट डिपार्टमेंटमध्ये रिपेयरिंगसाठी देण्यात आली होती. हा मोटार परिवहन विभाग नागपाडा येथे असून येथेच मुंबई पोलिसांच्या सर्व गाड्या दुरुस्त केल्या जातात. दरम्यान, हीच पांढरी इनोव्हा कार ही वाझे आणि त्यांची टीम सर्व ऑपरेशन्ससाठी वापरत होते.
ADVERTISEMENT