कल्याण: महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह ग्रामीण भागात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कल्याण-डोंबिवली, शहाड इत्यादी ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वे सेवाही बाधित झाले आहेत. कसारा घाट व इतर भागात काही रेल्वे रुळ उखडले गेले आहेत तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर लोकल ट्रेन सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
ADVERTISEMENT
रात्रभर मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, शहाड आदी भागातील पूरस्थिती निर्माण झाली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ठिकाणी लांब पल्ल्याच्या काही गाड्या थांबविण्यात आल्या असून अडकलेल्या रेल्वे प्रवाश्यांसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी सांगितले की बुधवारी रात्रीपासून मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते फक्त ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ स्टेशन व टिटवाळापर्यंत सुरू आहे.
शिवाजी सुतार यांनी अशी माहिती दिली की, टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते पुणे, लोणावळ्या या रेल्वे गाड्या अनेक रेल्वे स्थानकांवरुन अडकून पडल्या आहेत. या ठिकाणी रेल्वे मार्गावरील विविध ठिकाणी दगड कोसळले आहेत आणि पुरामुळे चिखल झाला आहे.
येथून 120 किलोमीटर अंतरावर कसाराजवळील अंबरमाळी स्थानकाजवळ कसारा घाटात पाणी भरल्याने मध्य रेल्वेने बुधवारी रात्री 10.15 वाजता मध्य रेल्वेने टिटवाला आणि इगतपुरी रेल्वे विभाग स्थगित केला होता.
रस्ते वाहतूक देखील ठप्प
दुसरीकडे कल्याण-मुरबाड रोड, रायते पूल, कल्याण बैलबाजार, एपीएमसीपर्यंत पुराचं पाणी पोहचलं आहे. तर याशिवाय म्हारळ, वरप, कांबा, रिजेंसी, थरवानी, कॉलानी फार्म, शहाड ब्रिज, मार्बल नगर मोहने रोड, भवानी नगर, घोलप नगर, योगीधाम, गणेश घाट दुर्गाडी, शांतिनगर उल्हासनगर परिसात देखील सर्वत्र उल्हास नदी व वालधुनी नदीचे पाणी शिरल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
Rain Update: कल्याण-डोंबिवली पाण्याखाली, मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर
दरम्यान, या पावसामुळे पत्रीपुल ते कल्याण, पत्रीपुल ते भिवंडी बायपास, नाशिक मार्ग, गोविंदवाडी बायपास, कल्याण-गांधारी रोड इत्यादी मार्ग या रस्त्यावर तासन्तास नागरिक अडकले आहेत.
कल्याण-शीळ रोडचीही अशीच परिस्थिती आहे. कल्याण शीळ रोड ते डोंबिवली कल्याण, पुणे, पनवेल, वाशी नवी मुंबई इत्यादी दिशेने जाणारे नागरिकांना प्रचंड वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे.
ADVERTISEMENT