Pandharpur: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत घेण्यात आला एक अत्यंत महत्वाचा निर्णय

मुंबई तक

• 06:41 PM • 08 Jul 2021

पंढरपूर: महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणीच्या (Vitthal-Rukmini Mandir) पुरातन मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची 8 जुलै रोजी नवीन भक्त निवासामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात येत्या 12 जुलै रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार […]

Mumbaitak
follow google news

पंढरपूर: महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणीच्या (Vitthal-Rukmini Mandir) पुरातन मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची 8 जुलै रोजी नवीन भक्त निवासामध्ये बैठक झाली.

हे वाचलं का?

बैठकीमध्ये मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात येत्या 12 जुलै रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे अतिशय पुरातन आहे. मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे मूळ स्वरुपातील सौंदर्य अबाधित ठेवत, मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

संपूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रथमच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये संत नामदेव पायरी पासून विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंतच्या मूळ मंदिरामध्ये आवश्यक ते बदल देखील केले जाणार आहेत. यासाठी पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. ही माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

बैठकीला मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, साधना भोसले, मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे साहयक संचालक विलास वाहने आदी उपस्थित होते.

‘शेगावसारखे प्रति ‘आनंद सागर’ पंढरपूरमध्ये व्हायला हवे’

तीर्थक्षेत्र शेगावमधील ‘आनंद सागर’ प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूर मध्ये व्हायला हवे, हे उद्यान उभा करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा. असे निर्देश काही दिवसांपूर्वीच विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले होते.

पंढरपूर शहरातील विकासकामे अन श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी गोऱ्हे यांनी ऑनलाइन बैठक घेतली होती. पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. दर्शनानंतर त्यांना क्षणभर विरंगुळा घेण्यासाठी एक प्रसन्न, प्रशस्त आणि शांत जागा असायला हवी. या उद्देशाने निलम गोऱ्हे यांनी पंढरपूरमधील प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.

पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे तर शिर्डीचे राष्ट्रवादीकडे

शेगावमध्ये आनंद सागर हे सुंदर उद्यान उभारले आहे. पंढरपूरमध्ये असे एक उद्यान असायला हवे नगरपरिषदेने अशा उद्यानासाठी तातडीने एक प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले होते.

    follow whatsapp