संपूर्ण देशभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. राज्यात देखील लसीकरणाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लसीकरण करवून घेतलं आहे. तर आता मराठी सृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने देखील लस घेतली आहे. सुबोधने लस घेतल्यानंतर सोशल मीडियावर फोटो अपलोड केला आहे.
ADVERTISEMENT
अभिनेता सुबोध भावेने त्याची पत्नी मंजिरीसोबत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यानंतर त्याने त्याचा आणि मंजिरीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला कॅप्शन दिलंय. या कॅप्शनमध्ये, लस घेतली तरी काळजी घ्यायची आहे, असं सुबोधने म्हटलं आहे. याशिवाय त्याने इतरांनी देखील सध्याच्या काळात काळजी घेतली पाहिजे असं आवाहन केलं आहे.
गेल्या वर्षी अभिनेता सुबोध भावेला देखील कोरोनाची लागण झाली होती. सुबोधसोबत त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांच्याही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर तिघांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वतःला घरीचं क्वारंटाईन ठेवलं होतं.
दरम्यान नुकतंच बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनीही कुटुंबासमवेत कोरोनाची लस घेतली आहे. त्यानंतर आज अभिनेत्री मलायका अरोरानेही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. मुंबईतील लिलावती रूग्णालयात जाऊन तिने लसीचा डोस घेतलाय. लस घेतानाचा फोटो शेअर करत तिने मी लस घेण्यासाठी पात्र आहे असंही कॅप्शनमध्ये म्हटलंय.
ADVERTISEMENT