सांगली : उसतोडणी मशिनला आग लागून दीड कोटींचं नुकसान

मुंबई तक

• 08:33 AM • 24 Jan 2022

सांगली जिल्ह्यातील बागणी येथे ऊस तोडणी मशिनला आग लागून सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तात्यासाहेब कोरे साखर कारखाना, वारणा मार्फत बागणी येथील काळी मशिद परिसरात मशिनच्या साहाय्याने ऊस तोडणी सुरु होती, यावेळी ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी सुरू असताना मशिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने […]

Mumbaitak
follow google news

सांगली जिल्ह्यातील बागणी येथे ऊस तोडणी मशिनला आग लागून सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तात्यासाहेब कोरे साखर कारखाना, वारणा मार्फत बागणी येथील काळी मशिद परिसरात मशिनच्या साहाय्याने ऊस तोडणी सुरु होती, यावेळी ही दुर्घटना घडली.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी सुरू असताना मशिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने मशिनला जवळच असलेल्या चौगुले पोल्ट्री फार्मजवळ उभी करण्यात आली होती. यावेळी मशिनचे काम सुरू असताना अचानक पेट घेतला. यावेळी दुरुस्ती करणारे व मशिनवर काम करणाऱ्या कामगारांनी प्रसंगावधान दाखवल्याने जीवितहानी टळली.

इचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या ऑईल निर्मितीच्या कारखान्याला आग, जिवीतहानी नाही

त्या ठिकाणी असलेल्या शेतकरी व तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतू आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आष्टा येथील अग्निशामक दलाची मदत घेण्यात आली. सुमारे तीन तास आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. या सर्वामध्ये ऊसतोडणी मशिन पूर्ण जळून खाक झाली असून,  सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    follow whatsapp