गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधताना शिवाजी पार्कच्या मैदानावर केलेलं भाषण सध्या चांगलंच गाजतं आहे. हिंदुत्वाची कास धरलेल्या राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा काढला. जर मशिदीवरचे भोंगे काढले गेले नाहीतर तर त्याच्यासमोर स्पिकरवर हनुमान चालीसा लावा असा आदेशही राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या या भूमिकेवर इतर राजकीय पक्षांनी टीका केलेली असली तरीही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर याने राज ठाकरेंच्या भूमिकेला १०० टक्के पाठींबा दिला आहे. परंतू हनुमान चालीसा लावण्यासाठी राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना पाठवावं असं सुजात यांनी म्हटलं.
राज ठाकरेंच्या भाषणाचं अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून कौतुक, म्हणाली…
हनुमान चालीसा स्पिकरवर लावण्यासाठी एकही बहुजन मुलाने जाऊ नये. घोषणा तुम्ही करणार आणि बहुजन मुलं त्यात भरडली जाणार. ठाकरेंच्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर पोलिसांना माहिती आहे की कोणाला पकडायचं असा टोलाही सुजात यांनी लगावला.
काय म्हणाले सुजात आंबेडकर?
राज ठाकरे यांनी म्हटलं की मुसलमानांनी भोंगे लावले तर मी पोरांना भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणायला लावेन. माझा ठाकरे यांच्या वक्तव्याला १०० टक्के पाठींबा आहे. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की, अमित ठाकरेंना तिकडे हनुमान चालीसा म्हणायला पाठवा. मला एकही बहुजन पोरगा तिथं नको आहे. जितकी पोरं हनुमान चालीसा म्हणायला जाणार आहेत त्यांनी शर्ट काढून जानवं दाखवा, एकही बहुजन पोरगा तिथं नको आहे. तसेच, ठाकरेंना विनंती आहे की तूम्ही शरद पवार यांचा इंटरव्ह्यू घ्या. तुमचा संपुर्ण पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदु मुस्लिम दंगलीवर उभा करु नका. तसेच, महाराष्ट्र पोलिसांना माझं आव्हान आहे की. तुमच्या सर्वांच्या समोर काल वक्तव्य केलं आहे. त्यामूळे तुम्हाला माहिती आहे की कुणाला पकडायचं आहे, असा जोरदार हल्लाबोल सुजात यांनी राज यांच्यावर केला.
फायरब्रँड नेते ‘पुष्पा’तले फ्लॉवर का झाले? मनसेची साथ सोडलेल्या रुपाली पाटलांची टीका
राज यांच्या भाषणाला सोशल मीडियावर समर्थकांकडून चांगलाच पाठींबा मिळताना दिसत असला तरीही भाजपचा अपवाद वगळता इतर सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या भाषणावर टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात या भाषणाचे राज्याच्या राजकारणात कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाषण करुन जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, टीका-नकलांशिवाय त्यांना काहीच जमलं नाही – अजित पवार
ADVERTISEMENT