बीडमध्ये घडलेल्या घटनेवरुन राज्यभरात वातावरण ढवळून निघालं. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर न्याय मागण्यासाठी देशमुख, भाजप आमदार सुरेश धस, मनोज जरांगे, जितेंद्र आव्हाड, अंजनी दमानिया यांनी अक्षरश: रान पेटवलंय. त्यानंतर वाल्मिक कराड यांच्याबद्दलच्या अनेक जुन्या घटनाही समोर येत असून, डोळे दीपवणरी संपत्तीही आहे पडद्याआड राहिली नाही. या सर्व मुद्द्यांवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Nagpur : चिकन खाल्ल्यामुळे एक वाघ आणि 3 बिबट्यांचा मृत्यू? बर्ड फ्लूची शंका, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण सोडून नेते एकत्र आलेत. जी घटना बीड आणि परभणीत झाली या विरोधात हे नेते पोटतिडकीने बोलत आहे. संसदेत जर कोणी सर्वात आधी बोलले असतील, तर बजरंग सोनवणे यांनी.बजरंग अप्पा हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी देशमुख यांच्या मारेकरीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. सर्वात आधी सभागृहात संदीप क्षीरसागर यांनी हा मुद्दा मांडला. PMLA चा ॲक्ट काळा पैसा पकडण्यासाठी आला, आता मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, कराड यांच्यावर अनेक केसेस आहेत. वाल्मिक कराड याच्यावर PMLA आणि ED ची कलमे का लावली नाहीत? त्यांना ED ची नोटीस असताना आणि खंडणीची नोटीस असताना त्यांच्यावर कारवाई का नाही? राज्य सरकारकडून कदाचित ही माहिती केंद्र सराराला दिली गेली नसेल. मी आणि बजरंगबप्पा याबाबत केंद्रात याबाबत माहिती देणार आहोत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे ही वाचा >> Jitendra Awhad : "हभप वाल्मिक कराडवर 22 गुन्हे, त्यातील सात गुन्हे 307 चे", आरोपांची मालिका सुरूच, आव्हाडांचं खळबळजनक ट्विट
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, वाल्मीक कराड यांना स्पेशल ट्रीटमेंट का दिली जातेय? लाडकी बहीण योजनांसारख्या योजनेचे परळीचे अध्यक्ष आजही वाल्मीक कराड आहेत. ज्या व्यक्तीवर खंडणीचा गुन्हा आहे त्याला तुम्ही या योजनेचा अध्यक्ष करता? असा सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
