Sushma Andhare : खैरलांजी ते धनंजय मुंडेंची केस...उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर सुषमा अंधारेंनी सांगितलं जुनं प्रकरण

"29 सप्टेंबर 2006 रोजी नागपूर पासून 37 किलोमीटर अंतरावर तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावामध्ये भोतमांगे हत्याकांड घडले होते. फाशीची शिक्षा कुणालाही झाली नाही."

Mumbai Tak

मुंबई तक

26 Feb 2025 (अपडेटेड: 26 Feb 2025, 11:37 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"खैरलंजी प्रकरणा फाशीची शिक्षा कुणालाही झाली नाही"

point

"उज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली"

point

"निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती"

"बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे." स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे.देशमुख कुटुंबाच्या वेगवेगळ्या मागण्यांपैकी एक असलेली मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मस्साजोगमध्ये सुरू असलेलं आंदोलन कधीपर्यंत सुरू ठेवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच अन्नत्याग आंदोलन करताना करण्यात आलेल्या इतर मागण्यांबद्दल चर्चा करण्यासाठी धनंजय देशमुख यांच्याशी कुणी संपर्क साधणार का हे पाहणं महत्वाचं असेल. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र, आता उज्ज्वल निकम यांच्याबद्दलची एक माहिती प्रसिद्ध करत भूमिका मांडली आहे.

हे वाचलं का?

सुषमा अंधारेंनी सांगितलं जुनं प्रकरण...

"संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या. 29 सप्टेंबर 2006 रोजी नागपूर पासून 37 किलोमीटर अंतरावर तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावामध्ये भोतमांगे हत्याकांड घडले होते. सिद्धार्थ गजभिये या गावातील एका दलित व्यक्तीचे शेतातील रस्त्यावरून स्थानिकांशी भांडण झाले.

हल्ल्यातून बचावलेल्या गजभियेने कामठी गावात जाऊन पोलिसात तक्रार दिली आणि या तक्रारीमध्ये साक्षीदार भैयालाल भोतमांगे आणि सुरेखा भोतमांगे झाले. गावकऱ्यांनी राग मनात धरला आणि भोतमांगेच्या झोपडीवर हल्ला चढवला जात पत्नी सुरेखा मुलगी प्रियांका आणि दोन मुलं रोशन आणि सुधीर यांच्या हत्या झाल्या. 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, फडणवीसांची माहिती

अल्पवयीन प्रियंका हिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार करून हालहाल करून मारले गेले. या प्रकरणात सरकारी वकील नेमले होते उज्वल निकम. या प्रकरणात एकूण 40 आरोपी होते. चाळीस वरून त्यांची संख्या 11 वर गेली.  फाशीची शिक्षा कुणालाही झाली नाही. खटला चालू असतानाच 11 पैकी दोघांचे मृत्यू झाले. कुटुंबातला शेवटचा माणूस भैय्यालाल न्याय मागता मागता 2017 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला.

एडवोकेट उज्वल निकम प्रकाशझोतात आले ते अजमल कसाब केसमुळे. पण लक्षात घ्या कसाबच्या केस मध्ये कोणीही वकील असता तरी कसाबला फाशीचं झाली असती. कारण त्याच्या विरोधात प्रचंड पुरावे होते आणि राष्ट्रविरोधी कारवाई मध्ये तो घटनास्थळी सापडला होता. 

एडवोकेट उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती हे कृपया विसरून चालणार नाही. उज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली. गेल्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष त्याच भाजपचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. आणि ते गृहमंत्री असतानाच परळी किंवा बीडमध्ये पोलिसांचा हैदोस चालू असतो हे विसरून चालणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फ्या केलेल्या नाहीत.

हे ही वाचा >> Pune : "शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यानं मला निलंबित केलं...", PCMC महिला कंडक्टरचा कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न

तरीसुद्धा आपल्या केस मध्ये वकील कोण असावा कोण नसावा हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा त्या पिडीत कुटुंबाचा असतो त्यामुळे उज्वल निकमांची नियुक्ती ही जर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना हवी असेल तर तो त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. आणि आपण त्यांच्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे..!!" असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 

    follow whatsapp