मुंबई: काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अनेक महिने लोटले आहेत. तरीही नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. आज (22 जून) कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांन दिली आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.
ADVERTISEMENT
…म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडबाबत चर्चा केली नाही!
‘कामकज सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. त्यामुळे कार्यक्रम पत्रिका येईल तेव्हा आपल्याला नेमका काय कार्यक्रम असेल हे समजेल. आजची बैठक ही कामकाज सल्लागार समितीची होती. त्यामुळे या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय काही चर्चेला येत नाही. हा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्याविषयी नेते निर्णय घेऊन आपल्याला कामकाज पत्रिकेच्या माध्यमातून सर्व विषय कळतील.’
‘आमच्यामध्ये कोणताही समन्वयाचा अभाव नाही. त्यामुळे जर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली तर आमचा आकडा आपल्याला दिसेल.’ अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही- फडणवीस
दोनच दिवसांचं अधिवेशन होणार!
यंदांचं राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन हे फक्त दोनच दिवस होणार आहे. 5 आणि 6 जुलैला असे दोनच दिवस अधिवशेन मुंबईत होणार. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नसल्याचं समजतं आहे.
नाना पटोलेंनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
याबाबत बोलताना अनिल परब असं म्हणाले की, ‘यंदाचं अधिवेशन हे 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. अद्यापही कोरोनाची महामारी संपलेली नाही. अद्यापही नवनवे स्ट्रेन सापडत आहेत. त्यामुळे कामगार सल्लागार समितीने कोरोनाचा उद्रेक होऊ यासाठी दोनच दिवस अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे.’
‘सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून सध्या हा निर्णय घेण्यात आला आहे.’ असं अनिल परब म्हणाले.
पुन्हा एकदा बहुमत चाचणी?
नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद कोणाचं यावरून ठाकरे सरकारमध्ये सतत कुरबुरी सुरू आहेत. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं वक्तव्य केलेलं होतं की, ‘विधानसभा अध्यक्षपद सगळ्यांसाठी खुलं झालं आहे.’
दुसरीकडे हे पद काँग्रेसकडेच राहील असं विधान काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने केलं जात आहे. खरं तर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया म्हणजे सरकारसाठी एक प्रकारची बहुमत चाचणीच असते. विधानसभा अध्यक्ष निवडणूक हा अत्यंत नाजूक असा विषय असल्याने तीनही पक्ष तो कसा हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT