अमरावती: अमरावतीतील मेळघाटमधील RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने संपूर्ण प्रशासनाला हादरा बसलाय. याप्रकरणाची सरकारने तात्काळ दखल उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना निलंबित केलं आहे. सध्या याच प्रकरणी ते अटकेतही आहेत. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
विनोद शिवकुमार यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. लवकरच त्यांची इतर पदावर बदली करण्यात येणार असून त्यांच्याकडील कार्यभार मुख्य वनसंरक्षक प्रविण चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या सुसाईड नोटने आणि त्यांच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणातील नेमकी बाजू समोर आली. या संपर्ण प्रकरणाचा ‘मुंबई तक’ने सलग पाठपुरावा केला. ज्यानंतर आता सरकारने तात्काळ कारवाई करुन दोनही अधिकाऱ्यांना दणका दिला आहे.
दीपाली चव्हाणांचा मानसिक छळ करणाऱ्या शिवकुमारवर कारवाई, पाहा राज्य शासनाच्या पत्रकात नेमकं काय म्हटलंय?
दिवंगत श्रीमती दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात विनोद शिवकुमार, उप वनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा यांच्याविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेमधील कलम 306 नुसार गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
यास्थितीत उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा या पदाचा अतिरिक्त कार्यभार अविनाश कुमार, भावसे, उपवनसंरक्षक (वन्यजीव), यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.
‘गर्भपात झाला तरी रजा दिली नाही’, वाचा दीपाली चव्हाणच्या पतीची संपूर्ण मुलाखत
त्याचप्रमाणे दीपाली चव्हाण यांनी विनोद शिवकुमार यांच्या वर्तणुकीबाबत वेळोवेळी अवगत करुनही एम. एस रेड्डी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तया क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.
सदरची बाब देखील गंभीर आहे. त्यामुळे त्यांना सदर पदावरुन अन्यत्र पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. यामुळे रेड्डी यांची अन्यत्र पदस्थापना होईपर्यंत त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनवल प्रमुख), नागपूर यांच्या कार्यालयात हजर राहून पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी.
सद्यस्थितीत त्यांच्या पदाचा कार्यभार प्रविण चव्हाण, भावसे, मुख्य वनसंरक्षक, अमरावती यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. सदर पत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांचे मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
दीपाली चव्हाण यांनी सुसाइड नोटमध्ये नेमके काय आरोप केले होते?
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये असा आरोप केला आहे की, ‘माझ्या आत्महत्येला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार आणि वन्यजीव विभाग चिखलदरा हेच जबाबदार आहेत.’ या सुसाइड नोटमध्ये विनोद शिवकुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
वन अधिकारी ते लेडी सिंघम… जाणून घ्या दीपाली चव्हाण यांच्याविषयी
‘विनोद शिवकुमारने मला अत्यंत त्रास दिला आहे. त्यांनी रजा कालावधीतील सुट्टी सुद्धा नाकारली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये मी प्रेग्नंट असताना मला विनोद शिवकुमार यांनी ट्रॅकिंग करवलं गेलं. त्यामुळे माझा गर्भपात झाला. एवढंच नव्हे तर त्यावेळी देखील मला पुरेशी सुट्टी देण्यात आली नाही. तसंच विनोद शिवकुमार हे मला रात्रीबेरात्री कुठेही भेटण्यासाठी अश्लील भाषेत बोलायचे. यावेळी ते माझे मानसिक आणि आर्थिक नुकसान करत होते.’
स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी दीपाली चव्हाणांनी लिहलेल्या पत्रात नेमकं काय लिहलं होतं?, पाहा ‘ते’ पत्र
‘अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांसमोर मला शिवीगाळ केली ज्यायची. अनेकदा शिवकुमारने मला त्यांच्या संकुलात बोलावले होते. ते माझ्या एकटेपणाचा गैरफायदा करत होते. पण मी त्यांच्या मर्जीनुसार न वागल्याने आता ते मला त्याच शिक्षा देत आहेत. मागील आठवड्यापासून शिवकुमार हे माझ्याशी खूप वाईट शब्दात बोलत आहेत. ज्याचा मला मानसिक त्रास होतोय.’ असे आरोप सुसाइड नोटमध्ये करण्यात आले आहे.
Dipali Chavan: महिला अधिकारी दीपाली चव्हाणांची गोळी झाडून आत्महत्या
ADVERTISEMENT