अमरावती जिल्ह्यातील खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव-बैनाई भागात तलाठी कार्यालयात वेश्याव्यवसायाचा अड्डा सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तलाठी कार्यालयात काम करणारा तलाठी व्ही.जी.भगत या कार्यालयाचा स्वतःच्या पदाचा वापरुन गैरवापर करत असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
२४ नोव्हेंबरला भगतने आपल्या कार्यालयात वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला आणलं होतं. यावेळी भगतचे काही मित्र त्याच्यासोबत होते. चार-पाच मित्रांची दारु पार्टी तलाठी कार्यालयात सुरु असल्याची माहिती गावकऱ्यांना समजली. ज्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन तलाठी भगतला रंगेहाथ पकडण्याचं ठरवलं. सर्व गावकरी कार्यालयात पोहचले असताना तिकडचं दृष्य पाहून थक्क झाले.
तलाठी कार्यालयात त्यावेळी दारु आणि मटण पार्टी सुरु असल्याचं दिसून आलं. गावकरी आल्याचं पाहताच तलाठी भगतने तीन मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले. घडलेल्या प्रकाराबद्दल गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरा घटनास्थळी येऊन तलाठी भगतला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT