TATA Group Projects : मिठापासून विमानांपर्यंत सर्व उत्पादनं आणि सेवांवर प्रभृत्व असणाऱ्या टाटा कंपनी आता आरोग्यसेवा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये टाटा ग्रुप मोठी गुंतवणूक करणार आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी सध्या टाटा समुहाकडून सुरू आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवलीतही पुण्यासारखीच कारवाई होणार, हजारो लोक होणार बेघर, प्रकरण काय?
टाटा समुहाचं स्वतः टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे. मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये या रुग्णालयाचा समावेश आहे. मात्र, त्यानंतर आता टाटा समूह मुंबईतील दुसऱ्या रुग्णालयातही गुंतवणूक करणार आहे. कंपनी आरोग्यसेवा क्षेत्रातही आपली पकड मजबूत करायच्या दृष्टीने हे पाऊल टाकत असल्याची चर्चा आहे. 1946 मध्ये बांधलेल्या या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये टाटाच्या 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे, ते या रुग्णालयाचे सर्वात मोठे आर्थिक भागीदार बनेल आहेत. टाटाच्या या 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानात सुधारणा होण्यास मदत होईल.
गुंतवणुकीतून टाटाला काय मिळणार?
हे ही वाचा >> Chhaava Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची हवा कायम... 200 कोटींचा आकडा पार, अनेक रेकॉर्ड मोडले
ब्रीच कॅन्ड हॉस्पिटलमध्ये 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे, टाटा समूह हॉस्पिटलचे सर्वात मोठे आर्थिक भागीदार असणार आहेत. यासोबतच, टाटा समुहाला रुग्णालयाच्या विद्यमान 14 सदस्यीय विश्वस्त मंडळात त्यांचे तीन प्रतिनिधीही नियुक्त करण्याचा अधिकार मिळेल. यासह, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष होतील. ते 1 ऑक्टोबर 2025 पासून दीपक पारेख यांची जागा घेतील.
ब्रीच कँडी हॉस्पिटलचे नाव बदलले जाईल का?
टाटांच्या 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर, असाही प्रश्न निर्माण झाला की, ब्रीच कँडी हॉस्पिटलचे नाव बदलणार का? पण तसं होणार नाहीये. ब्रीच कँडी हॉस्पिटलचं नाव तेच राहील, मात्र टाटा ब्रँड नावात काही प्रमाणात जोडला जाऊ शकतो.
ADVERTISEMENT
