ADVERTISEMENT
तौकताई वादळाचा फटका अखेरीस गोवा आणि महाराष्ट्राला बसला आहे. रविवारी सकाळी हे वादळ गोव्यात धडकलं ज्यानंतर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर या वादळाने धडक दिली. सकाळपासून गोव्यात ढगाळ वातावरण तयार झालं होतं.
खबरदारीचा उपाय म्हणून गोव्याचा समुद्रकिनारा आणि महत्वाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना जमण्यास बंदी घातली आहे.
गोव्यातल्या अनेक रस्त्यांवर झाडं कोसळून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावलेले खांब कोसळून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्यात ताशी ७० ते ८० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. ज्याचा फटका गोव्याला बसलाय. गोव्यातील महत्वाच्या शहरांत पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.
अनेक भागांमध्ये झाडं रस्त्यावर कोसळली आहेत. या भागातून जाणारा एक नागरिक..
सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे गोव्याच्या अनेक घरांवरील आणि कमर्शिअल कॉम्प्लेक्सवरचे पत्रे उडून गेले.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात निर्माण झालेली परिस्थिती
गोव्यात वाऱ्याचा वेग इतका होता की रस्त्यावरचे सिग्नल आणि पथदर्शक खांबही उन्मळून पडले
गोव्यात ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तयार झालेलं चित्र
ADVERTISEMENT