Tauktae Cyclone च्या पार्श्वभूमीवर मुंबईत सी लिंक म्हणजेच सागरी सेतू दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. NDRF ची टीम, नौदलाची टीम, अग्निशमन दलाची टीम तैनात आहे. साधारणतः 384 झाडांची छाटणी करण्यात आली आहे. वादळ वाऱ्यामध्ये ही झाडं उन्मळून पडू शकतात म्हणून ही खबरदारी घेतली गेली आहे असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही. मुंबईला तडाखा बसणार नाही बसलाच तरी सौम्य स्वरूपातला असेल सांगितलं गेलं आहे तरीही आम्ही पूर्णतः सज्ज आहोत असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
मुंबईत सहा चौपाट्या आहेत तिथे आपत्कालीन पथकं तैनात केली आहेत. सगळी व्यवस्था आहे, धोका कमी आहे हे सांगितलं आहे. मात्र निसर्गाचा अंदाज बांधता येत नाही. निसर्गाची ताकद ही माणसापेक्षा जास्त आहे त्यामुळे आम्ही खबरादारी घेत आहोत. उसळणाऱ्या समुद्रात येणारं वादळ जे येतं आहे त्यासंदर्भातली तयारी आपण केली आहे असंही महापौरांनी सांगितलं.
तौकताई Cyclone : मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी, महाराष्ट्रावर काय होणार परीणाम?
अरबी समुद्रात तौकतई चक्रीवादळ आलं आहे. त्याचा परीणाम हा आता मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात पाहण्यास मिळतो आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मुंबईच्या निरभ्र आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. नवी मुंबईतल्या पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात 15 आणि 16 मे रोजी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. तौकताई चक्रीवादळ लक्षद्विप, केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही अतिवृष्टी होते आहे. गुजरातच्या दिशेने हे वादळ 15 ते 17 मेच्या दरम्यान जातं आहे त्यामुळे कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तीव्र वादळ असणार आहे. एवढंच नाही तर 15 आणि 16 मे या दोन दिवशी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT