Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना! कांदिवलीच्या शाळेत ११ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग, शिक्षकावर गुन्हा दाखल

Mumbai Crime News: मुंबईच्या कांदिवली परिसरात असणाऱ्या एका शाळेत सातवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

Mumbai Tak

कोलकाता रेप-मर्डर केस के बाद ममता सरकार निशाने पर है (प्रतीकात्मक तस्वीर)

मुंबई तक

16 Aug 2024 (अपडेटेड: 16 Aug 2024, 11:43 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कांदिवलीच्या शाळेत ११ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग

point

शिक्षकावर पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल

point

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु

Mumbai Crime News: मुंबईच्या कांदिवली परिसरात असणाऱ्या एका शाळेत सातवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या पालकांचा आणि शाळेतील मुख्याध्यापकांचा जबाब नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या शेवटी शाळेतील शिक्षकाने वर्ग संपल्यानंतर अल्पवयीन मुलील बाहेर बोलावून तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. हा संपूर्ण प्रकार त्या मुलीनं मुख्याध्यापकांना आणि तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीनं पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो (२०१२) कायद्यांतर्गत अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. " मुख्याध्यापक आणि मुलीच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तपास सुरु आहे. या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी शाळेतील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले जात आहेत", अशी माहिती कांदिवली पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलीय. 

    follow whatsapp