ADVERTISEMENT
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. येत्या दोन दिवसात राज्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचला आहे.
उन्हाळा वाढला की खाडी आणि जवळील तलावांमध्ये मुलं पोहण्याचा आनंद घेताना.
मार्च मध्येच इतकं तापमान असल्याने पुढील तीन महिने कसे घालवणार असा प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांना पडला आहे. वाढत्या उष्म्यामुळे आजकाल सकाळी १० वाजल्यानंतर रस्त्यावरही वर्दळही कमी होताना दिसत आहे.
ठाण्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथसह इतर भागांत तापमानात वाढ झाली आहे.
घरातून बाहेर पडताना छत्री घ्यायला विसरल्यानंतर मग बॅगेतली पाण्याची बाटली अशा पद्दतीने डोक्यावर रिकामी केली जाते आणि वाढत्या उन्हापासून संरक्षणाचा मार्ग शोधला जातो.
उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत शहाळं, आईसक्रिम, सरबत यांच्या गाड्यांवर लोकांची गर्दी होताना दिसत आहे.
वाढत्या उन्हामुळे लहानग्या मुलांना आईसक्रीम, कुल्फी खाण्यासाठी एक निमीत्तच मिळालेलं आहे. आपल्या आईसोबत आईसक्रीमचा आनंद घेताना एक मुलगा
वाहनांची वाढती संख्या त्यामुळे प्रदुषणात पडलेली भर, वड-पिंपळ यासारखे डेरेदार वृक्ष नसणं यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना या उन्हाचा जास्तच त्रास होताना दिसत आहे.
या उन्हाचा फटका जसा माणसांना बसतो आहे तसाच तो पशु-पक्ष्यांनाही बसताना दिसत आहे. रस्ताच्या कडेला पक्ष्यांसाठी काही जणांनी पाणी पिण्याची सोय करुन ठेवली आहे.
ज्या पक्ष्यांना पाणी मिळत नाही मग त्यांचे अशा प्रकारे प्रयत्न सुरु होतात…
घराबाहेर पडल्यानंतर आजकाल टोपी सोबत बाळगणं हे अनिवार्य झालेलं आहे.
हवामान विभागानेही दुपारी १२ वाजल्यानंतर गरज नसेल तर घराबाहेर पडणं टाळा असं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT