100 कोटी वसुली : कोर्टाने वाचला वाझेच्या पापांच्या पाढा, देशमुखांविरोधात पुरावाच नाही!

विद्या

13 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:47 AM)

Anil Deshmukh Bail: मुंबई: सीबीआय (CBI) प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांच्या निवेदनाची दखल घेत हा गंभीर गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, न्यायमूर्ती कर्णिक यांनी या खटल्यातील पुराव्यांवर काही गंभीर शंकाही उपस्थित […]

Mumbaitak
follow google news

Anil Deshmukh Bail: मुंबई: सीबीआय (CBI) प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांच्या निवेदनाची दखल घेत हा गंभीर गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, न्यायमूर्ती कर्णिक यांनी या खटल्यातील पुराव्यांवर काही गंभीर शंकाही उपस्थित केल्या आहेत. तसंच अनिल देशमुखांना जामीन देताना कोर्टाने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या पापाचा धडाच वाचला आहे. (tenure of sachin waze as a police officer has been controversial cbi get into trouble because of sachin waze in anil deshmukh case bombay high court)

हे वाचलं का?

‘आर्थिक गुन्हा हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तो वेगळा गुन्हा म्हणून हाताळाव्या या गोष्टींशी मी सहमत आहे.’ असं न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी यावेळी म्हटलं आहे. तसंच सीबीआयने जे पुरावे दाखल केले आहेत त्याबद्दलही आपलं मत मांडताना कोर्टाने बरंच झापलं आहे.

पाहा कोर्ट नेमकं काय म्हणालं:

सीबीआयने जे काही पुरावे रेकॉर्डवर आणले आहेत ते आम्ही लक्षपूर्व पडताळले आहेत. या प्रकरणात सीबीआय बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबावर अवलंबून आहे. मात्र मुंबईतील बार मालकांकडून पैसे गोळा करण्याचे आहे. मात्र मुंबईतील बार मालकांकडून पैसे गोळा करण्याचे आदेश कोणी दिले याबाबत सीबीआयने केलेला दावा आणि पोलीस अधिकारी संजय पाटील या आरोपीने दिलेला जबाब यावरुन नंबर 1 नेमका कोण? असा प्रश्न निर्माण होतो.

सीबीआयच्या दाव्यानुसार नंबर 1 म्हणजे अनिल देशमुख. पण जेव्हा संजय पाटील यांनी सचिन वाझेला नंबर 1 कोण असं विाचरलं होतं तेव्हा पाटील यांना नंबर 1 हे सीपी मुंबई असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नेमकं कोणाच्या सांगण्यावरुन बार मालकांकडून पैसे गोळा करण्यात आले याबद्दल प्रश्न निर्माण होतो.

अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाकडून जामीन, पण 10 दिवस…

ज्या जबाबाच्या आधारे ही चौकशी सुरु आहे त्या जबाबाची मात्र सत्यता पडताळण्यात आलेली नाही. यावेळी कोर्टाने आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधलं, ‘संजय पाटील यांनी दुसऱ्या एका एजन्सीला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, वाझे हे आयुक्त सिंग यांच्यासाठी पैसे गोळा करत होते, मंत्री देशमुख यांच्यासाठी नव्हे. या संदर्भात न्यायमूर्ती कर्णिक म्हणाले, ‘दिलेल्या जबाबाची सत्यता तपासल्याशिवाय प्रकरणाची चौकशी झाली. त्यामुळे पैसे नेमके कोणाच्या इशाऱ्यावर गोळा केले गेले याबद्दल काही शंका निर्माण होतात.’

Anil Deshmukh Case Chronology: अँटेलिया, वाझे अन् 100 कोटी, कसे अडकलेले अनिल देशमुख?

पुढे कोर्ट असंही म्हणालं की, ‘ज्या वाझेच्या जबाबावरुन ही चौकशी सुरु आहे तो वाझे तब्बल 16 वर्षांसाठी बडतर्फ होता. त्यामुळे वाझेची कारकीर्द ही वादग्रस्त होती. त्याला एनआयएकडून एक व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्याच्यावर एका उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या भरुन गाडी ठेवल्याचाही आरोप आहे. तसेच खंडणी वसुली प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

हे लक्षात घेतलं पाहिजे की, वाझे हा संशयित आणि या प्रकरणातील एक आरोपी आहे. जो आता माफीचा साक्षीदार झाला आहे. त्यामुळे ही केस वाझेच्या जबाबावर सुरु आहे. पण इतर पुरावे लक्षात घेता या प्रकरणात कोर्टाच्या निरिक्षणावर अनिल देशमुख यांची कोठडी वाढवणं हे योग्य ठरणार नाही. अशी महत्त्वाची निरिक्षणं नोंदवत कोर्टाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.

    follow whatsapp