राज्यात उघडकीस आलेल्या टीईटी घोटाळ्या मोठे मासे गळाला लागताना दिसत आहे. राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एका आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुशील खोडवेकर असं अटक करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्याचं नाव असून, ते सध्या कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.
ADVERTISEMENT
राज्यात २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाचा पुणे सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून, दोन आयुक्तांना अटक केल्यानंतर आणखी एका आयएएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
टीईटी घोटाळा : 7,800 नापास उमेदवारांना पैसे घेऊन केलं पास; समोर आली धक्कादायक माहिती
मंत्रालयात कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या सुशील खोडवेकर यांना घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सुशील खोडवेकर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत शिक्षण विभागात कार्यरत होते. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
टीईटी परीक्षा घोटाळ्यात खोडवेकर यांचाही सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने खोडवेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी परीक्षा अन् कोट्यवधींचा भ्रष्टाचार; पोलिसांना आतापर्यंत काय सापडलं?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET) नापास झालेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे. शुक्रवारी (२८ जानेवारी) पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच ही माहिती दिली होती.
२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आल्याचं दिसून आलं असून, पोलिसांकडून त्याची पडताळणी केली जात आहे. परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आल्याचं समोर आल्यानंतर ही खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे धागेदोर राज्यभर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
TET Exam scam : तुकाराम सुपेंच्या पत्नीचा डाव फसला! लपवून ठेवलेलं 2.40 कोटींचं घबाड पोलिसांनी शोधलं
आतापर्यंत आरोग्य भरती तसेच TET परीक्षा गैरव्यवहारात दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांमध्ये तब्बल 40 जणांना अटक करण्यात आली आहे. तर टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा अश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी, डॉ. प्रीतिश देशमुख यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT