वरळीत रंगणार ठाकरे Vs ठाकरे लढाई? शिंदे गट हुकमी एक्का काढणार?

मुंबई तक

• 12:01 PM • 27 Oct 2022

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच आदित्य ठाकरेंना वरळीत घेरण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. सणासुदीच्या काळात तर भाजपने वरळीत मोठा जोर लावल्याचं दिसलं. पण आता वरळीतल्या लढाईत आता मोठा ट्विस्ट आलाय. ठाकरे विरुद्ध भाजप नाही, तर ठाकरे विरुद्ध ठाकरे, असा सामना होणार का? अशी चर्चा सुरू झालीय. या चर्चेला निमित्त ठरलंय शिंदे गटातले ठाकरे निहार ठाकरेंचं एक विधान. […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच आदित्य ठाकरेंना वरळीत घेरण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. सणासुदीच्या काळात तर भाजपने वरळीत मोठा जोर लावल्याचं दिसलं. पण आता वरळीतल्या लढाईत आता मोठा ट्विस्ट आलाय. ठाकरे विरुद्ध भाजप नाही, तर ठाकरे विरुद्ध ठाकरे, असा सामना होणार का? अशी चर्चा सुरू झालीय. या चर्चेला निमित्त ठरलंय शिंदे गटातले ठाकरे निहार ठाकरेंचं एक विधान. निहार ठाकरे नेमकं काय म्हणाले, त्याचा अर्थ काय तेच आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचलं का?

निहार ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत?

दिवाळी पाडव्यानिमित्त बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे गुरुवारी २६ ऑक्टोबरला इंदापुरात होते. सासरे हर्षवर्धन पाटलांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंनी लग्नानंतरचा पहिला पाडवा साजरा केला. शिवसेनेतल्या फाटाफुटीत राजकारणापासून दूर असलेल्या निहार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदेंनी एका ठाकरेंच्या एंट्रीने दुसऱ्या ठाकरेंना मात देण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं गेलं. यानंतर एका ठाकरे दुसऱ्या ठाकरेंविरोधात मातोश्रीविरोधात मैदानात उतरल्याचंही दिसलं. निहार हे निवडणूक आयोगात शिंदे गटाचे वकील म्हणूनही खिंड लढवत आहेत.

निहार ठाकरेंनी राजकारणात उतरण्याचे दिले संकेत

निहार ठाकरेंनी आता राजकारणात उतरण्याचे संकेत दिले. तसंच आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून निवडणुकीच्या राजकारणात उतरणार का, याबद्दलही भाष्य केलं. निहार यांनी राजकारणात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं. आता केवळ कधी राजकारणात येणार हे मात्र सांगितलं नाही. दुसरीकडे वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार का यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. पण राजकारणात काहीही शक्य आहे हे आपण गेल्या अडीच वर्षात पाहिलं आहेच.

निहार ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर

आदरणीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे नक्की करतील असं म्हणत निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जायला पाहिजे, ते काम एकनाथ शिंदे व्यवस्थित करतील म्हणूनच मी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाखाप्रमुख पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची वाटचाल केली आहे. मी आपल्याच पक्षाच्या माणसाला भेटलो आहे. त्यात वेगळं काय करण्याचं काहीही कारण नाही असंही निहार ठाकरे यांनी सांगितलं.

    follow whatsapp