Mazi Ladaki Bahin Yojana: 'या' भागातील 78000 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

मुंबई तक

27 Aug 2024 (अपडेटेड: 27 Aug 2024, 09:58 PM)

Mazi Ladaki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. जवळपास दीड कोटी महिलांना योजनेचे पैसे मिळाल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे.

Mazi Ladaki Bahin Yojana

Mazi Ladaki Bahin Yojana

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यातील या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

point

लाडकी बहीण योजनेबाबत जनसंपर्क विभागाने दिली महत्त्वाची माहिती

point

ठाण्यातील या भागातील ९३ टक्के महिलांचे अर्ज मंजूर

Mazi Ladaki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. जवळपास दीड कोटी महिलांना योजनेचे पैसे मिळाल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे. तसच या योजनेबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका क्षेत्र आणि या तालुक्यातून 82 हजारांहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. (More than 82 thousand women from Bhiwandi Municipal Corporation area of ​​Thane district and this taluk have applied for the benefit of Ladki Bahin Yojana)

हे वाचलं का?

योजनेबाबत जनसंपर्क विभागाने दिली महत्त्वाची माहिती

पात्र लाभार्थ्यांना निवडण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. प्रशासक अजय वैद्य यांच्या अध्यतेखाली या समितीची पहिली बैठक महापालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात झाली. शहर आणि तालुक्यातून एकूण 82493 लाभार्थी महिलांनी अर्ज केलं आहे. ज्यामध्ये 77995 लभार्थी महिलांचं अर्ज मंजूर करण्यात आलं आहे, अशी माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.

हे ही वाचा >> Badlapur News: 'तुझा रेप झालाय का?', असा आरोप असलेल्या वामन म्हात्रेंचं 'ते' CCTV फुटेज समोर

भिवंडी पूर्व विधानसभा समितीचे अध्यक्ष संजय काबूकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार महेश चौघुले, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, समाज कल्याण उपायुक्त डॉ.अनुराधा बाबर, भिवंडी पूर्व समिती सदस्य विभा पाटील, नमिता शेखावत, सदस्य बाळाराम जाधव, अर्चना नागले, शानू बेग, नितीन पाटील, विभाग प्रमुख नितेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पलसुले उपस्थित होते.

93 टक्के अर्ज मंजूर

ज्या महिलांचे अर्ज योग्य आहेत, त्या सर्व महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज अपुरे आहेत. त्यांना संपर्क साधून अर्ज जमा करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत 93 टक्के अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. चार हजार अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत. अपूर्ण असलेले 3803 अर्ज प्रलंबीत आहेत. तर ५२८ अर्ज अपात्र ठरले आहेत. सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असं अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी म्हटलं आहे. 

    follow whatsapp