वाढदिवसाच्या निमीत्ताने घरी बोलावून शीतपेयातून बिअर पाजून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन ठाणे पोलिसांनी आरोपी गणेश उर्फ जितू अशोक सुरवसेला गोव्यातून अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला वाढदिवसाचं निमीत्त साधून घरी राहण्यासाठी बोलावलं. यावेळी पार्टीदरम्यान आरोपीने शीतपेयातून बियर पाजली. यानंतर तरुणी नशेत असतानाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने मोबाईलमध्ये चित्रीकरण करत अश्लील फोटोही काढले. पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिने आरोपीशी भेटणं आणि बोलणं बंद केलं.
घरगुती भांडणातून पतीची तक्रार करायला गेलेल्या महिलेवर पोलिसाचा बलात्कार
परंतू यानंतर आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करतानाचा व्हिडीओ आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 2019 ते 2022 या कालावधीत वारंवार तिच्यावर बलात्कार केला. 2022 मध्ये पीडित तरुणीचं लग्न ठरल्याची माहिती मिळताच आरोपीने सोशल मीडियावर तिच्या नावाने खोटं अकाऊंट तयार करत, पीडित तरुणीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सेक्स चॅट आणि व्हिडीओ कॉल करायला सुरुवात केली.
यानंतर पीडित तरुणीला अनेक अनोळख्या व्यक्तींचे कॉल आणि मेसेज यायला सुरुवात झाली. यानंतर सर्व प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने कळवा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केला. मुळचा सोलापूरचा रहिवासी असलेला आरोपी गणेश हा वारंवार आपला मोबाईल नंबर बदलत पोलिसांना गुंगारा दिला होता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि गोवा अशा विविध राज्यात आरोपीचं लोकेशन मिळत होतं, ज्यामुळे पोलिसांना आरोपीला पकडणं कठीण जात होतं.
कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी दिलं मांत्रिकाच्या ताब्यात, महिलेवर ७९ दिवस बलात्कार
अखेरीस वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या मोबाईलचा IMEI नंबर ट्रॅक करुन त्याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली.
प्रसिद्ध गायिकेवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार, आरोपी अटकेत
ADVERTISEMENT