Crime news : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Madhya Pradesh Indore Crime news) एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लासुदिया पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास लावून घेतला. पोलिसांनी माहिती मिळताच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना (Suicide Note) सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये जीव देणाऱ्या व्यक्तीने पत्नीच्या अनैतिक संबंधांचा उल्लेख केला आहे. husband’s sensational suicide note
ADVERTISEMENT
‘नीतूला कृष्णासोबत बागेत पकडलं होतं’
पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या हितेश पाल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जीव देण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहिली होती. त्यात त्याने लिहिले की, “माझी पत्नी नीतू पालचे कृष्णा राठौरसोबत अनैतिक संबंध आहेत. ते लोक मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. दोघेही सोबत बागेत पकडले गेले होते, असं नोटमध्ये लिहलंय.”
Crime News : दिव्यांग मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत
‘ती मला सांगायची की तो माझा भाऊ आहे’
पुढे लिहलंय की, “या प्रकरणात आणखी एक महिलाही साथीदार आहे. तिचे नाव राणी उदासी आहे. मी गेल्या काही दिवसांपासून नीतू आणि कृष्णा यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवर लक्ष ठेवत होतो. मला चॅटमधून अशीही माहिती मिळाली की, बागेत भेटल्यानंतर नीतू ही चॅट करायची. ती कृष्णाला महागड्या भेटवस्तू द्यायची.ती मला सांगायची की तो माझा भाऊ आहे आणि पैशाचे व्यवहार करायचे. काही दिवसांपूर्वी नीलूने तिचा प्रियकर कृष्णाला एक मोठी गाडी भेट दिली तेव्हा हद्दच झाली. ही कार निलूच्या नावावर आहे, असं देखील त्यात नमूद आहे”
त्याने पुढे लिहिले की, नीतू, कृष्णा आणि राणी घरी एकत्र तंत्र-मंत्र करत असत. गेल्या 1 वर्षापासून ते मला स्लो पॉयझन देत होते. यामुळे मी सुस्त होऊ लागलो. माझे संपूर्ण शरीर काळे झाले. हे सर्व शवविच्छेदनात कळेल. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्या चॅटची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी.
‘हे तीन लोक माझ्या मृत्यूला जबाबदार’
पत्नीने त्याला काहीतरी खाऊ घालून संपूर्ण मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली आहे, असेही त्यात लिहलं आहे. मृत्यूनंतर ही संपत्ती त्याचा मुलगा युवराज आणि आई-वडिलांना द्यावी. तिला मला मारायचे होते. त्यामुळेच तिने सर्वत्र वारासपत्रात आपले नाव टाकले आहे. माझ्या मृत्यूला हे तीन लोक जबाबदार आहेत, असं मृत्यूपूर्वी त्याने लिहून ठेवलं आहे.
Crime News : विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, शेजाऱ्याने चिमुकल्याला बादलीत बुडवून मारलं
‘मुलाला आणि कुटुंबाला मदत करा’
मृताने सुसाईड नोटमध्ये इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. तसेच काही लोकांचे आभार मानले आणि त्यांच्या मुलाला आणि कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली. आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी बी.एस कुमरावत यांनी सांगितले. मृताच्या पत्नीचे अवैध संबंध सामोरे आले आहेत. शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT