मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर द फॅमिली मॅन 2 ची देखील घोषणा करण्यात आली. 12 फेब्रुवारी रोजी ‘द फॅमिली मॅन 2’ सिरीज अॅमेझॉन प्राईमवर रिलीज कऱण्यात येणार होती. मात्र ही सिरीज दिलेल्या तारखेला रिलीज करण्यात आली नाही. तर आता ‘द फॅमिली मॅन 2’ येत्या जूनमध्ये रिलीज होणार आहे.
ADVERTISEMENT
मनोज वाजपेयीची थ्रिलर सिरीज ‘फॅमिली मॅन 2’ ही 4 जून रोजी प्रदर्शित केली जाणार आहे. तर या वेबसिरीजचा ट्रेलर 19 मे म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. रिलीज डेट पुढे आल्यामुळे आता चाहते मात्र फार उत्सुक आहेत.
‘द फॅमिली मॅन’ या पहिल्या सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या सिझनसाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. गेल्या काळात काही कारणांमुळे या वेब सीरिजची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ही वेब सीरिज 4 जून रोजी रिलीज होणार आहे
दरम्यान द फॅमिली मॅन 2 वेबसिरिज हिंदीसोबतच भारतातील इतर भाषांमध्ये डब केली जाणारे. द फॅमिली मॅन या सिरीजमध्ये मनोज एक सीक्रेट एजेंटची भूमिका साकारतोय. या वेबसिरिजमध्ये मनोजसोबत प्रियामणी, शरद केळकर तसंच गुल पनाग हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत.
ADVERTISEMENT