भारताची गानकोकिळा कोण? हा प्रश्न विचारला तर कुणीही सांगेल की त्यांचं नाव आहे लता मंगेशकर. लता मंगेशकर यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच 16 डिसेंबर 1941 ला रेडिओसाठी दोन गाणी म्हटलं होती. लता मंगेशकर यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाल्या आहेत लता मंगेशकर?
’16 डिसेंबर 1941 हाच तो दिवस होता ज्या दिवशी मी माझ्या माईचा आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन रेडिओसाठी स्टुडिओत जाऊन दोन गाणी म्हटली होती. आज या गोष्टीला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 80 वर्षांमध्ये मला जनतेचं जे अतूट प्रेम आणि आशीर्वाद मिळाला तो मला गौरव वाटतो. मला खात्री आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मला असंच मिळत राहिल.’ या आशयाचं ट्विट लता मंगेशकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गेल्या 8 दशकांहून जास्त काळ रसिक गाणं हेच आपलं सर्वस्व मानलं. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालणारी आहेत. लता मंगेशकरांना गानकोकिळा, गासम्राज्ञी म्हटलं जातं ते त्यांच्या या अविरत सेवेसाठीच. हिंदी, मराठी गाणी म्हणत त्यांनी कलेची साधना केली आहे. आज त्यांच्या या कला साधनेच्या पहिल्या पुष्पाला म्हणजेच त्यांच्या पहिल्या गाण्याला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत.
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरूवात 1942 मध्ये झाली. त्यांनी आत्तापर्यंत 980 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी म्हटली आहेत. वीसपेक्षा जास्त प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी गायन केलं आहे. लता मंगेशकर यांचं कुटुंबच संगीत कला यासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडं आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीत गाणारे प्रसिद्ध गायक होते.
लतादीदींना गाण्याचा वारसा आपल्या वडिलांकडूनच मिळाला आहे. भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या लतादीदी या दुसऱ्या महिला कलाकार आहे. 2001 मध्ये भारत सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान कऱण्यात आला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सच्या उच्चांकासाठी लता मंगेशकर यांचं नाव नोंदवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT